स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भगूरस्थित स्मारकावर फडकला तिरंगा

भगूर, नाशिक येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवासस्थानी वाहिली आदरांजली

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भगूरस्थित स्मारकावर फडकला तिरंगा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’निमित्त वायुसेना आणि भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भगूर, नाशिक येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवासस्थानी आदरांजली वाहिली. विंग कमांडर गरिमा शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने श्रद्धांजली वाहताना तिरंगा फडकवला.

विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी वायू दलातील अधिकाऱ्यांसह हवाई दलाचे जवानही उपस्थित होते.विनायक दामोदर सावरकर यांना आदरांजली वाहण्यात आली. मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा घेऊन परेड काढली. सर्व विद्यार्थी लष्करी शाळेच्या गणवेशात होते. विंग कमांडर गरिमा शर्मा यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रति आदर व्यक्त करताना संदेश दिला.

हे ही वाचा:

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या

धक्कादायक! जळगावमध्ये भावाकडून बहिणीसह प्रियकराची हत्या

समीर वानखेडेंना जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीनचीट

उमेश कोल्हे हत्या प्रकरणी NIA कडून दहाव्या आरोपीला अटक

जन्मस्थळ झाले तिरंगामय

देशातील प्रत्येक घराघरात तिरंगा मोहीम सुरू आहे, या पार्श्वभूमीवर भोसला मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी हातात तिरंगा घेऊन भगूरमध्ये आले. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी तिरंगा झाली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांच्या स्वातंत्र्यासाठी वीर सावरकरांनी बलिदान दिले आणि असह्य यातना सहन केल्या, त्याच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही खरी श्रद्धांजली म्हणून साजरा होत आहे.

Exit mobile version