वक्फ दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भोपालमधील मुस्लीम महिलांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठींबा दिला आहे. विधेयकाच्या समर्थनार्थ मुस्लीम महिला हातात फलक घेऊन मुस्लिम महिला रस्त्यावर उतरल्या आणि पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
‘शुक्रिया मोदी जी’ असे फलक हातामध्ये घेवून मुस्लीम महिला मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसल्या. ‘मोदिजी तुम्ही संघर्ष करा आम्ही तुमच्या सोबत आहोत,’ अशा प्रकारच्या मोदींच्या समर्थनार्थ महिलांनी घोषणाही दिल्या. यावेळी एक महिला म्हणाली, वक्फने बेकादेशीरपणे ताब्यात घेतलेल्या जमिनीवर शाळा बांधण्यात याव्या. मुस्लिमांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. वक्फ दुरुस्ती विधेयकानुसार बोर्डाच्या समितीमध्ये आता एका मुस्लीम महिलेचा समावेश केल्याने ही एक चांगली गोष्ट असल्याचे मुस्लीम महिलेने म्हटले.
हे ही वाचा :
देशात मुलांना दत्तक घेण्याचा नवा विक्रम
“पंतप्रधान मोदी खिलाडियों के खिलाडी”; चिलीचे राष्ट्राध्यक्ष असे का म्हणाले?
पवन कल्याण यांची मोदी सरकारला साथ! लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा
म्यानमार भूकंपात मृतांचा आकडा कितीवर पोहोचला ?
वक्फ विधेयक मांडल्यापासून देशभरातील अनेक मुस्लिम संघटनांनी त्यावर टीका केली आहे. निषेध करणाऱ्यांमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) देखील आहे. तथापि, भोपाळमध्ये मुस्लिम महिला वक्फ विधेयकाला पाठिंबा देताना दिसल्या. दरम्यान, वक्फ सुधारणा विधेयक, २०२४ आज संसदेत सादर केले जाणार असून ते संमत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. कारण सत्ताधारी भाजपच नाही तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या खासदारांना विधेयकाच्या समर्थनार्थ मत देण्यासाठी व्हीप जारी केला आहे.