हाथरस दुर्घटनेतील एसआयटीच्या अहवालानंतर एसडीएम आणि सीओ यांना निलंबित करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, ही दुर्घटना गर्दीत विषारी वायूचे कॅन उघडल्याने झाल्याचा दावा नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा यांचे वकील एपी सिंह यांनी केला आहे. तसेच बाबाचे सेवक पीडितांना सतत मदत करत असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी वकिलाचे सर्व दावे उघड केले आहेत. ही घटना घडली तेव्हा बाबाचे सेवक पळ काढत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एका सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरी १२३ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणावर भोले बाबाचे वकील एपी सिंह यांनी रविवारी (७ जुलै) म्हटले होते की, हा अपघात विषारी वायूच्या श्वसनामुळे झाला आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर आमच्याशी प्रत्यक्षदर्शींनी संप्रर्क साधला. साक्षीदारांचे म्हणणे आहे की १५-१६ लोक विषारी वायूचे कॅन घेऊन जात होते आणि त्यांनी ते कॅन गर्दीच्या ठिकाणी उघडले. त्यामुळे तेथे चेंगराचेंगरी झाली आणि ही दुर्घटना घडली. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी वकिलाचे सर्व दावे फेटाळून लावेल आहेत.
हे ही वाचा:
हाथरस एसआयटी अहवालानंतर सहा अधिकारी निलंबित
मंत्रालयात जेष्ठ नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न !
वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर सापडला शहापुरात!
प्रिय राहुल भाई… रोहित शर्माचं प्रशिक्षक राहुल द्रविडला भावनिक पत्र
हातरस दुर्घटनेचे प्रत्यक्षदर्शी राजेश यांनी सांगितले की, चेंगराचेंगरी झाली तेव्हा ते ठिकाणापासून फक्त ७०-८० मीटर अंतरावर होते. लोक एकमेकांना पायदळी तुडवत पळत असताना बाबांचे सेवक एकामागून एक जात होते. जखमींना बाबांच्या सेवकांनी नाही तर पोलीस आणि स्थानिक लोकांनी मदत केली. बाबांचे सेवक घटनास्थळावरून निघाले होते. आणखी एका प्रत्यक्षदर्शीनेही असेच सांगितले. ते म्हणाले की, एवढी चेंगराचेंगरी झाली की लोक एकमेकांच्या अंगावर पडत होते आणि पळत होते. मात्र, बाबांच्या नोकरांनी तेथून पळ काढला आणि कोणीही वाचवायला आले नाही.