उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणामुळे मानसिक तणावात गेल्याचे नारायण साकार हरी उर्फ भोले बाबाने म्हटले आहे. या दुर्घटनेत तब्बल १२३ जणांचा मृत्यू झाला होता तर असंख्य लोक जखमी झाले होते. यावर प्रतिक्रिया देतात बाबाने म्हटले की, मृत्यू अटळ आहे, नशिबात जे आहे त्याला कोणीही रोखू शकत नाही. प्रत्येकाला एक दिवस मरायचे आहे. फक्त वेळ यावी लागते.
हातरसच्या घटनेबद्दल “दु:ख” व्यक्त करताना बाबा म्हणाले, ‘२ जुलै रोजी घडलेल्या घटनेनंतर आम्ही खूप नैराश्यात आहोत. आम्ही नैराश्याने ग्रासलो आहोत, पण नियतीला कोण टाळू शकेल? जो येईल त्याला जावेच लागेल, उशिरा का होईना’. विषारी फवारणी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे मान्य करून बाबाने चेंगराचेंगरीमागे ‘षडयंत्र’ असल्याचे म्हटले. काजी लोक बदनाम करत असल्याचा आरोपही त्याने केला. या प्रकरणाचा तपास पथकांकडून तपास सुरु आहे आणि लवकरच सत्य बाहेर येईल यावर आमचा विश्वास आहे. आम्ही या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबियांसोबत उभे आहोत, असे बाबाने सांगितले.
हे ही वाचा:
गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक, १२ माओवाद्याना कंठस्नान !
पोलीस कोठडीचे गज वाकवून आरोपीचे पलायन, सांताक्रूझ वाकोल्यातील घटना !
निवडणुकीच्या लगबगीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची लागण
छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात आयईडी स्फोटात दोन जवान हुतात्मा
दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) आणि न्यायिक आयोग या दोन्हींची स्थापना केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ब्रिजेश कुमार श्रीवास्तव आणि निवृत्त आयपीएस अधिकारी हेमंत राव यांच्या नेतृत्वाखालील न्यायिक आयोगही या घटनेची चौकशी करत आहे.