भोजपुरी गायक पवन सिंग यांची निवडणुकीतून माघार!

भाजपने आसनसोलसाठी उमेदवार म्हणून केले होते घोषित

भोजपुरी गायक पवन सिंग यांची निवडणुकीतून माघार!

भोजपुरी सिनेसृष्टीतील सुपरस्टार पवन सिंग यांनी पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.पवन सिंहने ट्विटरवर पोस्ट करून याची माहिती दिली आणि काही वैयक्तिक कारणे असल्याने निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले.मात्र, अचानक पवन सिंह यांनी आसनसोलमधून निवडणूक न लढवण्याची घोषणा केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

शनिवारी (२ मार्च) भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये पवन सिंह यांच्या नावाचाही समावेश होता. पवन सिंह यांच्याशिवाय भोजपुरी इंडस्ट्रीतील दिनेश लाल यादव, रवी किशन आणि मनोज तिवारी यांचीही नावे भाजपच्या या यादीत आहेत.दरम्यान,ही यादी आल्यानंतर पवन सिंह यांनी भाजप नेतृत्वाचे आभारही मानले.सहकाऱ्यांसोबत आनंद व्यक्त करतानाचा पवन सिंगचा एक व्हिडिओही समोर आला होता.

हे ही वाचा:

हैदराबाद : ओवेसींविरोधात भाजप उमेदवार माधवी लता यांनी शड्डू ठोकला!

भारतीय नौदलाचा खलाशी बेपत्ता, शोध मोहीम सुरु!

दिल्लीतील बदरपूरमध्ये कारचे नियंत्रण सुटून ट्रकला धडक, तीन जणांचा मृत्यू!

तीन मिनिटात ब्राह्मणांना संपवतो म्हणणारा अटकेत

परंतु, एका दिवसांनंतर पवन सिंहने ट्विटरवर पोस्ट करत निवडणुकीतून माघार घेतल्याचे सांगितले. पवन सिंहने पोस्टमध्ये लिहिले की, मी भारतीय जनता पक्षाचे मनापासून आभार मानतो. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला आसनसोलमधून उमेदवार म्हणून घोषित केले, पण काही कारणास्तव मी आसनसोलमधून निवडणूक लढवू शकणार नाही,” असे त्यांनी ट्विट केले.

Exit mobile version