राज्यासह देशात वाजणाऱ्या मशिदींवरील भोंग्यावर अनेक वेळा प्रश्न उपस्थित होत वाद निर्माण झाला आहे-होत आहे. मशिदींच्या भोंग्यावर अनेक हिंदुत्ववादी संघटना, भाजपने आक्षेप घेतला आहे. याच दरम्यान, भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी मशिदींच्या भोंग्यावर भाष्य केले आहे. मशिदींवरील सर्व भोंगे बेकादेशीर असून हिंदूंना जो कायदा लागू होतो तोच कायदा मुस्लीमांनाही लागू होतो, नितेश राणे यांनी म्हटले आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत आमदार नितेश राणे बोलत होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती सत्ता दिली, तर एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी वक्तव्य केले, असा प्रश्न नितेश राणे यांना विचरण्यात आला. यावर उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, मशिदींवर लावलेले लाऊडस्पीकर सर्व बेकायदेशीर आहेत, ते उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करतात. राज ठाकरे जे बोलत आहेत, तिच भावना सर्व हिंदू कार्यकर्त्यांची आहे. महाराष्ट्रात सर्व धर्म समान असेल, सर्व धर्मांना एकच कायदा लागू होईल, तर जो कायदा हिंदुना लागू आहे तोच कायदा इतरांनाही लागू झाला पाहिजे.
ते पुढे म्हणाले, हिंदूंचे नवरात्री सण असो, श्री गणेशाची आरती रात्री १० नंतर वाजवायला परवागनी देत नाहीत. तर दुसरीकडे हे लोक पाच-पाच वेळा भोंगे लावतात, हा काय त्यांचा बापाचा पाकिस्तान नाहीये, जे इकडे येवून वाजवत बसायला. राज ठाकरे जे काही बोलत आहेत, तेच आमचेही बोलणे आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था पाळली गेली पाहिजे. ‘जो कायदा हिंदूंना लागू होतो तोच कायदा मुस्लिम समाजालाही लागू झाला पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले.
हे ही वाचा :
‘उद्धव ठाकरे घरात नाहीतर लोकांच्या दारात शोभून दिसतात’
‘जम्मू-काश्मीर विधानसभेत हाणामारी, कलम ३७० चे बॅनर भाजपाने फाडले’
लोकसभेच्या पराभवानंतर भाजपाने केले मायक्रो मॅनेजमेन्ट!
उबाठाचे नेते भास्कर जाधव काँग्रेसवर वैतागले
दरम्यान, भाजपा, हिंदुत्ववादी संघटनासह राज ठाकरे यांनी देखील अनेकवेळा भोंग्यांविरोधात वक्तव्य केले आहे. अमरावतीचे मनसेचे उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी (६ नोव्हेंबर) राज ठाकरेंनी मशिदींच्या भोंग्यावर भाष्य केले होते. सभेला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती सत्ता दिली, तर एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही.
#WATCH | Maharashtra | On MNS chief Raj Thackeray's statement over loudspeakers on mosques, BJP candidate from Kankavli assembly constituency, Nitesh Rane says,"Look, the loudspeakers that are installed on mosques are all illegal; they violate the High Court's order. What Raj… pic.twitter.com/fOwtQH25es
— ANI (@ANI) November 7, 2024