शांतनू गुप्ता लिखित, मल्हार पांडे यांनी अनुवादित केलेल्या ‘भाजपा : काल, आज, उद्या’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवार, १९ एप्रिल रोजी पुण्यात पार पडला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तर राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.
या कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. राम सातपुते, आ. प्रशांत परिचारक, मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि इतरही नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी “हे पुस्तक म्हणजे केवळ भाजपाचा इतिहास नाही, तर एका शाश्वत विचाराला अंमलात आणणार्या संघटनेचा विचार आहे” असे मत व्यक्त केले.
हे ही वाचा:
दिल्लीत मास्कसक्ती, मास्क न वापरल्यास ५०० रुपये दंड
कुमार विश्वास यांच्या घरी पोहचले पोलीस; ट्विट करत मुख्यमंत्र्यांना दिला इशारा
सदावर्तेंच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; कोल्हापूर पोलिसांनी घेतला ताबा
कुतुबमिनारजवळच्या मशिदीसाठी उद्ध्वस्त केली होती २७ मंदिरे
यावेळी फडणवीसांनी सर्व भारतीयांचा डीएनए एकाच असल्याचे प्रतिपादन केले. “आमच्यावर आक्रमण करणार्या प्रत्येक आक्रमकाला हे माहिती होते, की भारताची संस्कृती एकदा ध्वस्त केली की राज्य करणे सोपे आहे. भारतीय समाजाचा तेजोभंग करण्याचा त्यांचा हेतू होता. तेच काम पुढे इंग्रजांनी केले. भारतीय संस्कृती, भारतीय सभ्यता ही सर्वांत जुनी आहे, हा शोध लागला आणि तो समाजापुढे आला. डीएनएची नवीन थेयरी समोर आली आणि सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे, हे सिद्ध झाले. आम्ही दुय्यम नाही, तर जगाला विचार देणारे आहोत.”
आत्मतेजाने, आत्मभानाने भारलेला समाज निर्माण होण्याची गरज. हिंदूत्त्व हे संकुचित नाही, तर ते व्यापक आहे. या संस्कृतीचा वाहक म्हणून भारतीय जनता पार्टी काम करते आहे. आमच्या रक्तात हिंदूत्त्व. त्यामुळे आम्हाला कोणतीही शाल पांघरण्याची गरज नाही असे म्हणत त्यांनी काही राजकीय चिमटे सुद्धा यावेळी काढले.