घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.आरोपी भावेश भिंडेच्या पोलीस कोठडीत २९ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
मुंबईत अवकाळी पावसामुळे घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेत निष्पाप १९ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.या दुर्घटनेत भावेश भिंडे हा मुख्य आरोपी होता.दुर्घटना घडल्यानंतर आरोपी भावेश फरार झाला होता.त्याला उदयपूरमधून मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.आरोपी भावेश भिंडेची अद्याप चौकशी सुरु आहे.दरम्यान, आज त्याची पोलीस कोठडी संपणार होती.आता यामध्ये तीन दिवसांची वाढ करून म्हणजेच २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे ही वाचा:
मुंबईत नालेसाफाई युद्धपातळीवर सुरु
सराफा व्यावसायिकांवर छाप्यात २६ कोटींची रोकड, ९० कोटींचे बेहिशेबी दस्तावेज जप्त!
राजस्थानमध्ये उष्णतेचे ‘अर्धशतक’; फलोदीत ५० अंश तापमान
‘ठाकरे’ राऊतांवर भडकले…गडकरींबद्दलच्या वक्तव्यावरून नाराजी!
आरोपी भावेश भिंडे याच्यावर या अगोदरच अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली होती.वृक्ष तोड करून होर्डिंग्सची उभारणी केल्याप्रकरणी देखील त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते.दरम्यान, त्याची आज पोलीस कोठडी संपणार होती.ताच्या चौकशी करिता पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी कोर्टात केली होती.मात्र, कोर्टाने तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.ती आता २९ मे पर्यंत असणार आहे.
दरम्यान, घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश प्रभूदास भिंडे (५१) याला बेकायदा जाहिरात फलक लावल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने शंभरपेक्षा अधिकवेळा दंड ठोठावल्याची माहिती पोलिसांच्या तपासात नुकतीच उघड झाली होती.या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.