तलवारबाज भवानीला जयललितांनी दिला होता मदतीचा हात !

तलवारबाज भवानीला जयललितांनी दिला होता मदतीचा हात !

कोरियात १५ वर्षांपूर्वी आशियाई तलवारबाजीची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात भवानी देवी सहभागी होणार होती. २००८ हे ते वर्ष. पण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिच्याकडे पुरेसा निधी नव्हता. तेव्हा तिने मुख्यमंत्री जयललिता यांच्याशी संपर्क साधला. जयललिता यांनी भवानीदेवीला बोलावून घेतले आणि तिच्या हाती धनादेश सोपवला. याच स्पर्धेत १५ वर्षांनी जेव्हा भवानीदेवी सहभागी झाली तेव्हा तिने इतिहास रचला. आशियाई अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धेत तिने ब्राँझपदकविजेती कामगिरी केली.

 

हे पदक जिंकल्यानंतर तिचे मन त्या दिवसांत रमलं. दिवंगत जयललिता यांच्या आठवणी तिच्या मनात ताज्या झाल्या. २०२१मध्ये ती ऑलिम्पिकमध्ये खेळली होती. भारतातून तलवारबाजी या खेळात गेलेली ती पहिली खेळाडू ठऱली होती. पण त्याहीपेक्षा चीनमधील वुक्सी या शहरात झालेल्या आशियाई स्पर्धेतील पदकविजयाचा आनंद काही वेगळाच होता.
उपांत्य फेरीत तिला उझबेकिस्तानच्या झैनाब दैबेकोव्हाकडून पराभव स्वीकारावा लागला. २९ वर्षीय भवानीदेवीचा हा सामना वादग्रस्त ठरला होता पण तिला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

 

ती म्हणाली की, ती लढत आव्हानात्मक असेल हे मला ठाऊक होते, पण त्यासाठी मला उपांत्यपूर्व फेरीत एमुराला पराभूत करणे आवश्यक होते. कारण मी गेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिच्याकडून उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाले होते. त्यामुळे यावेळी ती संधी तिला द्यायची नाही, असे ठरविले होते.

 

पुजाऱ्याची मुलगी असलेली भवानी देवी हिच्यामध्ये तलवारबाजीची गुणवत्ता होती. ती गुणवत्ता २००७मध्ये सागर लागू यांनी हेरली. त्यांनी थलासरी, केरळ येथे तिला भारतीय क्रीडाप्राधिकरणाच्या केंद्रात नेले. २००८मध्ये तिने राष्ट्रीय स्तरावरील १७ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. २०१७मध्ये आइसलँड येथे टूरनोई सॅटेलाइल तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तिथे तिने सुवर्णपदक जिंकले आणि ती या स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठऱली.
भवानीने नंतर इटलीचे प्रशिक्षक निकोला झॅनोटी यांच्याकडे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर टोकियो ऑलिम्पिक आधी ती फ्रान्सला गेली. तिथे ती आता ख्रिस्तियन बावर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

हे ही वाचा:

संभाजीनगरचे नागरीक तहानलेले; पण आयुक्तांच्या वाढदिवसावर पाण्यासारखा पैसा खर्च

पालिकेतल्या भ्रष्टाचाराविरोधात आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात महापालिकेवर १ जुलैला मोर्चा

ओडिशा अपघात प्रकरणी चौकशी सुरू असलेला सिग्नल इंजिनिअर कुटुंबासह बेपत्ता

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताची गरज

ती त्याबद्दल म्हणते की, ख्रिस्तीयन हे जगातील सर्वोत्तम दर्जाचे प्रशिक्षक आहेत. त्यांनी याआधी चिनी खेळाडूंना मार्गदर्शन केलेले आहे. इटली, रशियाच्या खेळाडूंनाही त्यांनी सहाय्य केलेले आहे. विशेष म्हणजे या सगळ्या खेळाडूंनी, संघांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. ती म्हणते की, अजूनही मी नवनवे तंत्र शिकत आहे, नव्या तंत्राशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण समाधान आहे की, मी आशियाई स्पर्धेत पदक जिंकू शकले.याआधीच्या तीन स्पर्धांत तिने एमुराला नमविले नव्हते. पण यावेळी तिने सगळ्या चुका सुधारल्या. या चुकांची पुनरावृत्ती करायची नाही हे मी ठरविले असे ती म्हणते. त्याचे फळ तिला मिळाले आहे.

Exit mobile version