केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट पदासाठीच्या परीक्षेत मीरारोडची भावना यादव ही देशात १४ वी आहे. तर मुलींमध्ये ती देशात प्रथम आली आहे.
विशेष म्हणजे मातंग समाजातील प्रथम महिला आयपीएस होण्याचा मान भावनाला मिळाला आहे. सदर परीक्षेत महाराष्ट्रातून उत्तीर्ण झालेली ती एकमेक महिला आहे. भावना मूळची सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील. तिचे वडील सुभाष यादव हे पोलीस दलात कार्यरत आहेत. भावना हिचे प्राथमिक शिक्षण अंधेरीच्या सेंट झेवियर्स शाळेत झाले. त्यानंतर यादव कुटुंबीय मीरारोडला स्थलांतरीत झाल्यावर तीने मीरारोडच्या शांतीपार्क येथील सेंट झेवियर्स शाळेमधून दहावी उतीर्ण केली. त्यानंतर तीने विरारच्या विवा महाविद्यालयातून आपले एमएसीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
भावनाने लहानपणापासूनच केंद्रीय सेवेत जाण्याचा निश्चय केला होता. त्यासाठी तिने २०१५ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली होती. राज्य लोकसेवा आयोगाची पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा ती दोन वेळा उत्तीर्ण देखील झाली होती. मात्र मैदानी चाचणीत दोन्ही वेळेस तिला अपयश आले होते. मात्र तिने खचून न जाता प्रयत्न सुरूच ठेवले.
हे ही वाचा:
नाशिकमध्ये गॅसच्या भडक्यात सहाजण होरपळले
अंधेरी क्रीडासंकुलात लग्नसोहळ्याच्या गर्दीत कोरोना चेंगरला
कशी विश्वनाथ धाम येथील कर्मचाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ खास भेट
सदावर्तेंना हटवून पेंडसेंची नियुक्ती; संप मागे घेण्याचे शरद पवारांचे आवाहन
यावेळी भावनेने बाजी मारलेली परीक्षा २०२० मध्ये घेण्यात आली होती. तिची मैदानी आणि शारीरिक चाचणी तळेगावच्या सशस्त्र दलाच्या कॅम्प मध्ये १९ एप्रिल २०२१ रोजी झाली. दोन्ही चाचणीत ती उत्तीर्ण झाल्यानंतर २२ डिसेंबर २०२१ रोजी दिल्ली येथील मुख्यालयात तिची मुलाखत झाली होती. ४ जानेवारीला तिचा निकाल जाहीर झाला. आता ती लवकरच हैदराबाद येथे वर्षभराच्या प्रशिक्षणासाठी जाणार आहे. परीक्षेत देशभरातील एकूण विद्यार्थी १८७ उत्तीर्ण झाले आहेत.