25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषअब की बार...३२५ पार

अब की बार…३२५ पार

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मिळणार यश; भाऊ तोरसेकरांचा विश्वास

Google News Follow

Related

येत्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली किती जागा मिळतील असा प्रश्न प्रसिद्ध राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांना विचारण्यात आला आणि त्यांनी तडक ३२५ ते ३५० जागा मोदींच्या नेतृत्वाखाली मिळतील असा ठाम विश्वास व्यक्त केला. प्रतिपक्ष या यू ट्युब चॅनलचे प्रमुख भाऊ तोरसेकर हे न्यूज डंकाच्या तिसऱ्या दसरा दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी नेहमीच्या शैलीत राजकारणाच्या इतिहास भूगोलावर परखड भाष्य केले. यावेळी ऍनलायझर या यूट्युबचे प्रमुख सुशील कुलकर्णी, न्यूज डंकाचे प्रमुख संपादक दिनेश कानजी, आमदार आणि न्यूज डंकाचे सल्लागार संपादक अतुल भातखळकर उपस्थित होते.

भाऊंनी पत्रकारितेच्या झालेल्या ऱ्हासापासून आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले की, महात्मा फुलेंच्या डोक्यावर पगडी असते की पागोटे हे ज्यांना ठाऊक नसते ते तटस्थ असतात. हा अजेंडा असा काही चालवला जातो की, पत्रकारिता हा राइट टू इन्फॉर्मेशन राहिलेला नाही तर राइट टू मिसइन्फॉर्मेशन बनून गेला आहे.

भाऊ म्हणाले की, जरांगे पाटील उपोषणाला बसले पुन्हा त्यांनी काही अवधी दिला आणि उपोषण सोडले. नंतर पुन्हा उपोषण सुरू केले. पण महाराष्ट्र सरकारच्या हातातच जो विषय नाहीए त्यांनी दोन वर्षे उपोषण केले तरी महाराष्ट्र सरकार काही करू शकणार नाही, हे माहिती असूनही यावर कुणी बोलत आहे का?

तेव्हा मोदींना प्रेक्षकांमधून प्रश्न विचारण्यात आला की, २०२४च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना किती जागा अपेक्षित आहेत, त्यावर भाऊ म्हणाले की, ३२५ ते ३५० जागा मोदी जिंकतील असा मला विश्वास आहे. अडवाणी कार्यरत असताना त्यांचे नेतृत्व तितके आक्रमक नव्हते आणि भाजपा सेक्युलर व्हायला निघाला होता. त्यांचा मतदार तेव्हा बिथरला होता नवा मतदार सेक्युलर त्यांच्याकडे आला नाही. पण आता चित्र बदलले आहे.

स्मारकात जमलेल्या भरगच्च गर्दीला संबोधित करताना भाऊंनी हे अधिक विषद केले. ते म्हणाले की, आपल्या देशात टीव्ही जितका बघितला जातो, १०० प्रेक्षकांपैकी पावणेदोन टक्के न्यूज चॅनल बघतात सगळया भाषेतले. ९८ टक्के लोक तुम्हाला चॅनेलला विचारतही नाहीत. तो माणूस आपल्या अनुभूतीवर मतदान करतो. पत्रकारांची उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे म्हणून मतदान करत नाही. भाऊंनी सांगितले की, आता लोकांना काय मिळाले आहे तर प्रथमच केंद्र सरकारशी कोट्यवधी नागरीक जोडला गेला आहे. एक सैनिक मारला जातो तेव्हा त्याच्या नातेवाईकांच्या आयुष्यात काय फरक पडला ते दिसते. तळागाळातील माणसांच्या आयुष्यात फरक पडतो याला महत्त्व असते. राहुल गांधींच्या आयुष्यात काही फरक पडत नाही.
२०१४च्या निवडणुकीचा निकाल लागल्यावर मोदी दिल्लीत पोहोचले भाजपाच्या मुख्यालयाच्या गच्चीवरून भाषण केले तेव्हा ते म्हणाले की, हा विजय माझा नाही, निवडणुकीसाठी मेहनत घेतली त्यांचा विजय नाही, १९५२पासून जनसंघाच्या स्थापनानेपासून जे राबले, खपले त्यांचा हा विजय आहे. ही जाणीव आहे ती त्याला नेता बनवते.

हे ही वाचा:

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर मागे; सरकारला २ जानेवारीपर्यंत दिला वेळ

मराठा आरक्षणामुळे संभाजीनगरातील आठ आगाराच्या एसटी बस जागेवरच!

बँक कर्जाचे पैसे जेटच्या संस्थापकांनी पत्नी, मुलाच्या माध्यमातून इतरत्र वळवले

‘एकमेकांशी मोकळ्या मनाने संवाद साधून अढी दूर करा’!

मी पुस्तकात लिहिलं होतं की, मोदी एनडीएला बहुमत आणणार नाहीत तर ते भाजपासाठी बहुमत घेऊन येतील. त्यांना पंतप्रधान का व्हायचं आहे हे माहीत आहे. तो तोंडाने बोलणार नाही पण गांधी नेहरू पुसून टाकेल. मी हे जे बोललो त्याची चर्चा २०१९-२० नंतर सुरू झाली. लोक बोलू लागले की, हा माणूस नेहरूंचा वारसा संपवत आहे पण मी ते २०१३लाच लिहिले होते ना. पुन्हा मोदीच का हे मी जे पुस्तक लिहिले त्यातही मी ३०० पेक्षा अधिक जागा येतील असेच भविष्य वर्तविले. खरोखरच तेव्हा तीनशेपेक्षा अधिक खासदार निवडून आले.

 

मागे एकदा एक मुलाखत झाली तेव्हा त्या मुलाखतकाराची अपेक्षा होती की मी हिंदुत्ववादी आहे त्यामुळे नेहरू गांधींच्या विरोधात बोललो पाहिजे. पण मी त्याविरोधात बोललो नाही उलट मी म्हटले की, गांधी नेहरू चुकीचे वागलेच नाहीत. तेव्हा मी त्याला म्हटले की, एक काम कर. डॉक्टरने दिलेले औषध आहे ना ते एक्सपायरी डेट संपल्यावर घे. तो म्हणाला असे कसे होईल. गांधी नेहरूंची एक्स्पायरी डेट संपली आहे. तुम्ही तेच औषध एक्स्पायरी डेट संपल्यावर घेता तेव्हा ते अपायकारक असते. तेव्हा ते योग्यही होते त्या काळापुरते होते. काळ बदलला तर तुम्ही बदलले पाहिजे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा