24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषशार्क टँक इंडिया फेम ‘भारत पे’चे सह- संस्थापक अश्नीर ग्रोव्हर पायऊतार

शार्क टँक इंडिया फेम ‘भारत पे’चे सह- संस्थापक अश्नीर ग्रोव्हर पायऊतार

Google News Follow

Related

‘भारत पे’चे सह- संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिंगापूरमधील फिनटेक प्लॅटफॉर्मविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या लवादात अश्नीर ग्रोव्हर यांचा पराभव झाला. ‘भारत पे’ या फिनटेक युनिकॉर्नच्या बोर्डाला पाठवलेल्या ईमेलमध्ये, अश्नीर ग्रोव्हर यांनी सांगितलं आहे की, मी अत्यंत दुःखी असून ज्या कंपनीचा मी संस्थापक आहे, आज त्याच कंपनीला जड अंतःकरणाने निरोप देण्यासाठी मला भाग पाडलं जात आहे.

यापूर्वी, ‘भारत पे’ने कंपनीच्या ‘कंट्रोल्स’ विभागाच्या प्रमुख आणि अश्नीर ग्रोव्हर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर यांना आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली बडतर्फ करण्यात आले होते. अंतर्गत तपासणीत फिनटेक प्लॅटफॉर्मवर असताना निधीचा गैरवापर झाल्याचे समोर आले होते. कोटक महिंद्रा बँकेच्या कर्मचार्‍यांविरुद्ध अयोग्य भाषा वापरल्याबद्दल अश्नीर ग्रोव्हर यांना वादाचा सामना करावा लागल्यानंतर, त्यांची पत्नी माधुरी जैन यांनीही मार्च अखेरपर्यंत स्वेच्छा रजा घेतली होती.

जानेवारी महिन्यात ‘भारत पे’चे सह- संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर यांनी मार्चपर्यंत रजेवर जाण्याची घोषणा केली होती. त्यापूर्वी जानेवारीच्या सुरुवातीला एका ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्यामध्ये अश्नीर हे कोटक महिंद्रा बँकेच्या कर्मचाऱ्याला फोनवर धमकावत होते. नायका च्या IPO दरम्यान शेअर्स वाटप करताना बँकेकडून अनियमितता झाल्याचा आरोप करत, ते संबंधित कर्मचाऱ्याला धमकावत होते. मात्र, अश्नीर यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.

हे ही वाचा:

युक्रेनला भारताकडून मदतीचा हात

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक साक्षीदार पलटला

महाशिवरात्री पूजेचे महत्त्व; काय असतात विधी?

मागण्या मान्य झाल्याने छत्रपती संभाजी राजे यांचे उपोषण मागे

अश्नीर ग्रोव्हर हे काही दिवसांपूर्वीच ‘सोनी टीव्ही’ वरील शार्क टँक इंडिया या कार्यक्रमात परिक्षण करणाऱ्या भूमिकेत दिसले होते. अश्नीर ग्रोव्हर यांनी IIT दिल्लीमधून सिविल इंजिनियरिंगमध्ये B-Tech ही डिग्री मिळवली आहे. तसेच त्याने IIM अहमदाबाद मधून MBA केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा