सादरीकरणावेळी मंचावरचं भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन

वयाच्या ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सादरीकरणावेळी मंचावरचं भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन

ज्येष्ठ भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ओडिशामधील भुवनेश्वर येथे आपल्या कलेचे सादरीकरण करत असतानाच त्यांचे निधन झाल्याने सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

ओडिशामधील भुवनेश्वर येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य करत असतानाच ते मंचावर कोसळले. आयोजकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आपले सादरीकरण करताना त्यांनी मंचावर प्राण सोडले. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

श्री गणेशन हे मलेशियातील कुआलालंपुर येथील श्री गणेशालयाचे संचालक होते.भुवनेश्वर येथील कार्यक्रमात  सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येणार होते. गीत गोविंदावर आधारित भरतनाट्यम सादर करत असताना ते मंचावर कोसळले.

श्री गणेशन हे मूळचे मलेशियाचे रहिवासी होते. आपल्या भरतनाट्यम सादरीकरणासाठी ते भारतात आले होते. परंतु, भुवनेश्वर येथे ते ‘गीत गोविंद’ यावर आपले नृत्य सादर करतानाच त्यांना मृत्यू झाला. कार्यक्रमापूर्वी श्री गणेशन यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ते कला सादर करताना अचानक मंचावर कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार, त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version