केंद्रीय उत्पादन शुल्कात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या कंपन्यांत भारत पेट्रोलियमचा डंका

सीजीएसटी आणि उत्पादन शुल्कात उत्पन्नाचे भरीव योगदान दिल्याबद्दल सन्मानित

केंद्रीय उत्पादन शुल्कात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या कंपन्यांत भारत पेट्रोलियमचा डंका

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या आघाडीच्या कंपनीला मुंबई झोनसाठीच्या सीजीएसटी (सेंट्रल गुड्स आणि सेवा कर) आणि उत्पादन शुल्कात उत्पन्नाचे भरीव योगदान दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. जीएसटी दिन साजरा करण्याच्या निमित्ताने मुंबईत झालेल्या एका भव्य समारंभात हा प्रतिष्ठित सन्मान कंपनीला बहाल करण्यात आला.

बीपीसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जी. कृष्णकुमार आणि वित्त संचालक व्हीआरके गुप्ता यांनी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून प्रशस्तीपत्रक आणि प्रशंसा पत्रक स्वीकारले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बीपीसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जी. कृष्णकुमार म्हणाले, “मुंबई झोनमधील सीजीएसटी आणि उत्पादन शुल्कासाठी लक्षणीय उत्पन्नाचे योगदान देणारी कंपनी म्हणून बीपीसीएलचा करण्यात आलेला सन्मान देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना देण्यात कंपनी निभावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची दखल घेणारा आहे.”

सातत्याने करपूर्ती करत आणि सरकारच्या उत्पन्नासाठी भरीव योगदान देत बीपीसीएलने कॉर्पोरेट नागरिकत्वाची जबाबदारी निभावली आहे तसेच देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लावला आहे.

सरकारने जारी केलेल्या वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीनिमित्त १ जुलै रोजी जीएसटी दिन साजरा केला जातो. ही केंद्र सरकारने अंमलात आणलेल्या महत्त्वाच्या कर रचनांपैकी एक आहे. या सर्वसमावेशक कर यंत्रणेमुळे भारताची अर्थव्यवस्था आणि उद्योगक्षेत्रात घडून आणलेल्या क्रांतीकारी प्रभावाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

हे ही वाचा:

विश्वासघात करणाऱ्यांनी परवानगीनंतरचं फोटो वापरावेत

आंदोलनकर्त्या कुस्तीगीरांच्या चाचणीचे भवितव्य अधांतरी

अफगाणिस्तानमधील महिलांचे ब्युटी सलून बंद होणार

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली

कर पालनात बीपीसीएलने केलेली अतुलनीय कामगिरी आणि उत्पन्न निर्मिती यावरून कंपनीचे दमदार आर्थिक व्यवस्थापन व न्याय्य व्यावसायिक पद्धती दिसून येतात. यामुळे गुणवत्ता, नाविन्य आणि देशाच्या हितासाठी योगदान देणारी उर्जा क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी म्हणून बीपीसीएलचे स्थान अधिक बळकट झाले आहे.

Exit mobile version