संपूर्ण देशभरात लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या वेगाने राबवला जात आहे. अशातच ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे सातत्याने महाराष्ट्रातील विविध लसीकरण केंद्रांवरील लसी सातत्याने संपल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर लस पुरवठ्यासाठी भारत बायोटेक महाराष्ट्राच्या मदतील पुढे सरसावले आहे.
महाराष्ट्रासाठी ही दिलासादायक बातमी आहे की, कोवॅक्सिन या लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने महाराष्ट्र सरकारला येत्या सहा महिन्यात ८५ लाख डोस देण्याची तयारी दर्शवली आहे.
हे ही वाचा:
आता ठाकरे सरकारने मरण्याची वेळही निश्चित करावी
आयपीएस रश्मी शुक्ला यांनी सीबीआयकडे केले अनेक गौप्यस्फोट?
कच्चा माल देण्यात कुरकुर करणाऱ्या अमेरिकेची आता थेट लस देण्यास तयारी
ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन
संपूर्ण देशभरातच १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरीकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला पत्र पाठवलं होतं.
या पत्रावर उत्तर देताना भारत बायोटेकने येत्या सहा महिन्यात महाराष्ट्राला कोरोना लसीचे ८५ लाख डोस देण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. परंतु त्यासाठी आगाऊ रक्कम भरण्याची मागणी भारत बायोटेकने केली आहे.
या पत्रात भारत बायोटेकने म्हटलं आहे की, “मे महिन्यात राज्याला कोरोना लसीचे पाच लाख डोस देऊ शकतो. या लसींच्या सहाय्याने सरकार लसीकरण अभियानाचा तिसरा टप्पा सुरु करु शकतं. यासाठी ६०० रुपये प्रति डोस यानुसार दर आकारले जातील.” या लसींसाठी कंपनीने आगाऊ रक्कम मागितली आहे.
महाराष्ट्र सरकारला मे महिन्यात कोरोना लसीचे पाच लाख तर जून आणि जुलै महिन्यात १० लाख डोसचा पुरवठा करण्याची तयारी असल्याचं कंपनीकडून सांगितलं जात आहे. याशिवाय ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात २० लाख डोसचा पुरवठा करु, असंही भारत बायोटेकने आपल्या उत्तरात म्हटलं आहे.
ठाकरे सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियालाही महाराष्ट्र सरकारनं पत्र पाठवलं होतं. याचसंदर्भात माहिती देत उत्तर देत सिरम इन्स्टिट्यूट २० मे पर्यंत लस देऊ शकणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं होतं.