संभलमध्ये ४६ वर्षांपासून बंद असलेल्या मंदिरात भंडारा, भाविकांची गर्दी उसळली!

दर्शनासाठी मंदिरात भाविकांचे मोठ्या प्रमाणात आगमन

संभलमध्ये ४६ वर्षांपासून बंद असलेल्या मंदिरात भंडारा, भाविकांची गर्दी उसळली!

उत्तर प्रदेशातील संभल सध्या चर्चेचा विषय बनले आहे. खग्गू सराई परिसरात असलेल्या पुरातन कार्तिकेय महादेव मंदिराचे दरवाजे ४६ वर्षांनंतर उघडल्यानंतर शनिवारी (२१ डिसेंबर) मंदिरात भंडारा आयोजित करण्यात आला होता. भंडाराही ४६ वर्षानंतर आयोजित करण्यात आला.

मंदिरात पोहोचलेल्या भाविकांनी मंदिरात दर्शन तर घेतलेच शिवाय भंडाराचा प्रसादही घेतला. भंडारा आयोजकांनी सांगितले की, मंदिराचे दरवाजे उघडल्याचा आनंद साजरा करण्यासाठी ४६ वर्षांनंतर आज पहिला भंडारा आयोजित करण्यात आला आहे. १४ डिसेंबर रोजी प्राचीन कार्तिकेय महादेव मंदिराचे दरवाजे उघडले, यापूर्वी त्याला टाळे होते. मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर भाविकांचे मोठ्या प्रमाणात आगमन होऊ लागले आहे.

१९७८ च्या दंगलीनंतर हे मंदिर बंद करण्यात आले होते. तब्बल ४६ वर्षांनंतर त्याचे दरवाजे उघडले. यानंतर मंदिरात भजन-कीर्तन व महाआरतीनंतर भंडारा आयोजित करण्यात आला. भगवान भोलेनाथांना भोजन अर्पण केल्यानंतर लोकांमध्ये प्रसादाचे वाटप करण्यात आले. भंडाऱ्यात भाजी, पुरी, हलव्याचा प्रसाद तयार करण्यात आला होता. दरम्यान, मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर येथे दररोज भाविक पूजेसाठी येत आहेत. हे मंदिर सपा खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या भागातील मोहल्ला खग्गु सरायमध्ये आहे.

हे ही वाचा: 

शहापुरात ज्वेलर्सबाहेर गोळीबार,कामगाराचा मृत्यू!

महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर, गृहखाते फडणवीसांकडेच, शिंदेकडे नगरविकास खाते

घाटकोपरमध्ये पाण्याच्या टाकीत पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

महाराष्ट्राला प्रगत, समृद्ध करण्यासाठी महायुती सरकार अहोरात्र काम करेल

 

Exit mobile version