भजनलाल शर्मा हे राजस्थानचे पुढील मुख्यमंत्री आहेत, अशी घोषणा भारतीय जनता पक्षाने (भाजप) मंगळवारी केली. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांनी सांगानेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८,०८१ मतांनी पराभव केला.
राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी केली.राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांच्या यादीत भाजपच्या वसुंधरा राजे ,गजेंद्र शेखावत, महंत बालकनाथ, दिया कुमारी, अनिता भदेल, मंजू बागमार आणि अर्जुन राम मेघवाल यांची नावे होती.मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.यासोबतच राजस्थानमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील, असा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यासाठी प्रेमचंद बैरवा आणि दिया कुमारी यांच्या नावांना मंजुरी देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
काँग्रेस पक्ष देशात असताना ‘मनी हाईस्ट’ या काल्पनिक कथानकाची गरज आहे का?
बेंगळुरूच्या डॉक्टरांनी तब्बल १८ वर्षानंतर माणसाच्या डोक्यात अडकलेली गोळी काढली बाहेर!
निवडणूक आयोगाने तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांचे निलंबन घेतले मागे!
रुग्णालयाच्या शौचालयात फेकले बाळाला!
कोण आहे भजनलाल शर्मा?
भजनलाल शर्मा हे भरतपूरचे असून ते सांगानेर मतदारसंघातून निवडून आले आहेत. मतदारसंघाबाहेरचे असल्याचा आरोप असतानाही सांगानेरच्या जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. भजनलाल शर्मा यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८,०८१ मतांनी पराभव केला. भजनलाल शर्मा हे संघ आणि भाजप संघटना या दोघांच्याही जवळचे मानले जातात.