‘भगूर’ १५ दिवसात होणार पर्यटन स्थळ

५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा

‘भगूर’ १५ दिवसात होणार पर्यटन स्थळ

सावरकरप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ असलेल्या भगुरला येत्या पंधरा दिवसांच्या आत अधिकृतरित्या पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात येणार आहे. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा केली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने नाशिकमधील भगूर येथे वीर सावरकर गार्डन थीम पार्क आणि संग्रहालय विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ही घोषणा केली आहे.

थीम पार्क पुढच्या वर्षी २८ मे पर्यंत पूर्ण होईल, असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त पर्यटन विभागाच्या वतीने पदयात्रा आणि अभिवादन कार्यक्रम नाशिकमधील भगूर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पर्यटनमंत्री लोढा यांनी घोषणा केली.

आज आनंदाचा क्षण असून सावरकर यांचा वाडा बघून आनंद झाला.एक ऊर्जा मिळाली.भगूरच्या रहिवाश्यांमुळे भगुर एक तीर्थस्थान झाले आहे. तुम्ही आजपर्यंत सावरकर यांची ज्योत जपली. सावरकर स्वातंत्र्यवीर होते, हिंदू संघटक होते. त्यांनी सामाजिक उत्थान करण्यासाठी देखील प्रयत्न केले. स्वातंत्र्यवीर सावरकर) यांचे विचार भारतातच नव्हे तर जगभरात पोहचविण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने सावरकरांचे जन्मस्थान भगूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय व भव्य थीम पार्कची करण्यात येणार आहे असे पर्यटनमंत्री यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

मुश्रिफांवर अखेर कोल्हापुरात गुन्हा दाखल

आझाद यांना ‘गुलाम’ म्हणणाऱ्या जयराम रमेश यांच्यावर २ कोटींचा दावा

‘जमाई’ करायला गेला कमाई आणि आला पोलिसांच्या जाळ्यात

कोविडनंतर बेरोजगारीचे प्रमाण घसरणीला.. आले इतक्या टक्क्यांवर

गेली अनेक वर्ष अपूर्णावस्थेत असलेले हे थीम पार्क हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करून त्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होत आहे. पुढील पंधरा दिवसांच्या आत भगुरला अधिकृतरित्या पर्यटन स्थळ म्हणून घोषित करू. थीम पार्क देखील पुढच्या वर्षी २८ मे रोजी पर्यंत पूर्ण होईल, असे लोढा यांनी सांगितले.

Exit mobile version