भगतसिंग यांचे नातू यादवेंद्र सिंह यांनी आम आदमी पक्षावर संताप व्यक्त केला आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तुलना भगतसिंग यांच्याशी केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.ते म्हणाले, हे पाहून मला आणि भगसिंगाच्या प्रेमींना खूप वाईट वाटले.आम आदमी पक्षाने भविष्यात असे करू नये, असे आवाहन देखील यादवेंद्र सिंह यांनी केले.यादवेंद्र सिंह यांनी एक व्हिडिओ जारी करत आपली प्रतिक्रिया दिली.
अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांच्या मागे भगतसिंग आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता अन या दोन महा मानवांच्या फोटोमध्ये केजरीवाल यांचा फोटो लावलेला पाहायला मिळाला.यानंतर हा वाद सुरु झाला.
दारू घोटाळ्या प्रकरणी केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर दोन महामानवांच्या फोटोमध्ये केजरीवाल यांचा फोटो लावण्यात आला. यावरून भाजपने आप वर टीका केली. भगतसिंग आणि आंबेडकर यांचा हा अपमान असल्याचे भाजपने म्हटले आहे.त्याचवेळी आम आदमी पक्षाने आपला बचाव करत म्हटले की, केजरीवाल भगतसिंग यांच्यासारखे हुकूमशाही विरुद्ध लढत आहेत आणि त्यासाठी तुरुंगात गेले आहेत.आता भगतसिंग यांच्या नातवानेही या तुलनेवर नाराजी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा:
उरीमध्ये दहशतवाद्यांचा कट फसला, एक दहशतवादी ठार!
पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करत असल्याचा ‘द गार्डियन’चा भारतावर आरोप
मोदी सरकारच्या सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेचा राहुल गांधींकडून लाभ
बोगस जामीनदाराची टोळी उद्ध्वस्त, ५जणांना अटक
यादवेंद्र सिंह यांनी एक व्हिडिओ जारी करत म्हटले की, हे पाहून खूप वाईट वाटले.आम आदमी पक्षाने के करू नये.कोणत्याही राजकारण्याने स्वतःची तुलना भगतसिंग आणि आंबेडकर यांच्याशी करू नये.तुमच्या मनाप्रमाणे वैयक्तिक राजकारण करा, पण या महान लोकांशी तुलना करू नका.त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालण्याचा प्रयत्न करू शकतो.मला संपूर्ण भारतातुन प्रतिक्रिया मिळत आहेत.भगतसिंग आणि आंबेडकर यांच्या प्रेमींना हे वाईट वाटले आहे.आम आदमी पक्षाने भविष्यात हे टाळावे.