गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. ३१ ऑगस्टला घरोघरी वाजत गाजत, मिरवणुका काढत श्रीचे आगमन होईल. मिरवणूक बघण्यासाठी गणेश भक्तांची खूप गर्दी होईल. पण जरा सावध. मुंबईतील १३ पूल धोकादायक स्थितीत असल्याचं मुंबई महापालिकेनं म्हटलं आहे.आहेत.श्रीगणेश आगमन आणि विसर्जनासाठी पुलावरुन जाताना पुलावर जास्त वेळ न थांबता त्वरित पुढे जावं असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे
मध्य रेल्वे वरून जाणारे ४ आणि ‘पश्चिम रेल्वे लाईन’ वरुन जाणारे ९ पूल हे अतिशय जुने झाल्याने धोकादायक स्वरुपाचे झालेले आहेत. या १३ पुलांपैकी काही पुलांची दुरुस्तीची कामे सुरु आहेत किंवा पावसाळ्यानंतर सुरु करण्यात येणार आहेत. या पुलावर ध्वनिक्षेपकाचा वापर करु नये तसेच नाच-गाणी इत्यादी बाबी टाळावे असेही पालिकेने म्हटले आहे.
मध्य रेल्वे लाईन’ वरील चिंचपोकळी रेल ओव्हर ब्रिज (आर्थर रोड) आणि करीरोड रेल ओव्हर ब्रिज पार करताना बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिस यांच्याद्वारे देण्यात आलेल्या व वेळोवेळी देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे असेही सांगण्यात आलं आहे.
हे ही वाचा:
एव्हरेस्ट सर करणारे अरुणाचलचे पहिले गिर्यारोहक बेपत्ता
मंदीच्या भीतीने शेअर बाजार गडगडला
जमीन अधीग्रहणाची मंजुरी मिळाली आता बुलेट ट्रेन धावणार सुसाट
हे पूल धोकादायक
घाटकोपर रेल ओव्हर ब्रिज, करीरोड रेल ओव्हर ब्रिज, साने गुरुजी मार्ग (आर्थर रोड) रेल ओव्हर ब्रिज, भायखळा रेल ओव्हर ब्रिज या पुलांचा समावेश आहे. मरिन लाईन्स रेल ओव्हर ब्रिज, ग्रँटरोड व मुंबई सेंट्रलच्या दरम्यान असणारा फॉकलंड रेल ओव्हर ब्रिज, मुंबई सेंट्रलच्या जवळ असणारा बेलासिस पूल, महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर ब्रिज, प्रभादेवी कॅरोल रेल ओव्हर ब्रिज, दादर टिळक रेल ओव्हर ब्रिज यांच्यासह ग्रँटरोड व चर्नीरोडच्या दरम्यान असणारे सँडहर्स्ट रोड रेल ओव्हर ब्रिज, फ्रेंच रेल ओव्हर ब्रिज आणि केनडी रेल ओव्हर ब्रिज
..
या पुलांवर १६ टनपेक्षा जास्त वजन नको
करीरोड रेल ओव्हर ब्रिज, साने गुरुजी मार्ग (आर्थर रोड) रेल ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी रेल ओव्हर ब्रिज आणि भायखळा रेल ओव्हर ब्रिज या पुलांवर एकावेळेस १६ टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही, याची काळजी घेण्याचेही आवाहन पालिकेने केलं आहे.