सावधान ! डासांचे आक्रमण सुरू झाले आहे

सावधान ! डासांचे आक्रमण सुरू झाले आहे

???????????????????????????

पावसाळ्यातील संसर्ग आजार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे डास. मुंबईत या आजारांनी पसरायला सुरुवात केली आहे. मुंबईत ज्या ठिकाणी अर्धवट बांधकामांमुळे इमारती रिकामी आहेत अशा ठिकाणी डासांचे उत्पत्ती केंद्रे निर्माण होत आहेत. डासांची उत्पत्ती केंद्रे निर्माण होऊ नयेत म्हणून अशा ठिकाणी फवारणी होणे आवश्यक आहे. तसेच अशा जागा नष्ट करण्याची गरज आहे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नारळाच्या करवंट्या, कुंड्या, थर्माकोल तसेच टायरसारख्या ठिकाणी डासांची उत्पत्ती केंद्रे निर्माण होत असतात. अनेक वस्तूंमध्ये असलेल्या थोड्याश्या पाण्यातही ही उत्पत्ती केंद्रे डास निर्माण करू शकतात. त्यातून निर्माण होणारे डास हे डेंग्यू, हिवतापसारख्या घातक रोगांचा प्रसार करण्यासाठी कारणीभूत असतात.

अशा डासांना नष्ट करण्यासाठी वस्तूंमध्ये साचलेले पाणी सतत हटवणे आणि अशा वस्तूंना नष्ट करणे गरजेचे असते. गेल्या काही वर्षातील आकडेवारीनुसार ८० टक्के डेंग्यूबाधित रुग्णांच्या घरात किंवा त्यांच्या घरांच्या परिसरात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती केंद्रे आढळून आली होती.

हे ही वाचा:
केवळ दोन डोस घेतलेल्यांनीच मॉलमध्ये जा…..वाचा सविस्तर!!

‘मुख्यमंत्र्यांच्या घोषणेआधीच उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय; ही तर श्रेयाची लढाई’

भारताने केली कोळशाची निर्यात

नॉटिंगहॅम कसोटी: भारताची स्थिती चांगली…पण वातावरण खराब

मुंबईमधील बहुतांश लोकसंख्या ही चाळीत आणि झोपड्यांमध्ये राहते. मुंबईतील अनेक भागात बैठी वस्ती आहे. गिरगाव, डोंगरीचा पूर्व भाग, वडाळा, माहीम परिसरातही मोठ्या प्रमाणात दाटीवाटीची वस्ती आहे. कालिना, कुर्ला, मरोळ, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी यथे मोठ्या संख्येने झोपड्या आहेत. या सर्व वस्त्यांमध्ये साफसफाई आणि वेळच्या वेळी फवारणीची आवश्यकता आहे. महापालिका आणि नागरिकांनी याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Exit mobile version