सावधान! राम मंदिराच्या नावाने क्यू-आर कोड पाठवून उकळतायत पैसे

राम मंदिर ट्रस्टकडून कोणालाही पैसे गोळा करण्याचे अधिकार दिलेले नाही, विहींपचे प्रवक्ते विनोद बन्सल

सावधान! राम मंदिराच्या नावाने क्यू-आर कोड पाठवून उकळतायत पैसे

अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे.सोहळ्याची तारीख जवळ येत आहे.याबाबत रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे.दरम्यान, मंदिराच्या नावाखाली भाविकांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी माहिती दिली आणि फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

विनोद बन्सल म्हणाले की, सोशल मीडियावर मेसेज पाठवून मंदिराच्या नावाने लोकांकडून देणगी मागितली जात आहे.या मेसेज मध्ये क्युआर कोड देखील आहे आणि त्यावर स्कॅन करा आणि पेमेंट करा असे लिहिले आहे.हा पैसा राम मंदिराच्या उभारणीत गुंतवकीला जाईल असे मेसेज मध्ये लिहिले आहे.मात्र, हा पैसा फसवणूक करणाऱ्या लोकांच्या खात्यामध्ये जात असल्याचे त्यांनी सांगितले.

विनोद बन्सल पुढे म्हणाले की, या प्रकरणी गृह मंत्रालय आणि दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.त्यांनी स्पष्ट केलं की, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र या मंदिराच्या बांधकामावर देखरेख ठेवणाऱ्या ट्रस्टने निधी गोळा करण्याचे काम कोणालाही सोपवलेले नाही.त्यामुळे फसवणुकीच्या प्रयत्नांपासून सावध राहण्याची गरज असल्याचे त्यानी सांगितले.बन्सल यांनी ट्विट करत लिहिले की, मंदिराच्या नावावर पैसे गोळा करण्याचे काम काही लोक करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली.याबाबत मी गृह मंत्रालय,उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक आणि दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीरची ‘तहरीक-ए-हुर्रियत’ दहशतवादी संघटना म्हणून घोषित!

म्यानमार मधून मिझोराममध्ये पोहचलेल्या १५१ सैनिकांना भारताचा आधार!

जयंत पाटील भाजपाबरोबर येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता

इम्रान खान निवडणूक लढण्यास अपात्र

ते म्हणाले की, मंदिर ट्रस्टकडून कोणालाही पैसे गोळा करण्याचे काम दिलेले नाही.त्यामुळे फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले.२२ जानेवारीचा सोहळा आनंदी सोहळा आहे आम्ही आमंत्रण पाठवत आहोत.मात्र, आम्ही कोणाकडूनही देणगी घेत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version