28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषबेस्ट ४०० बसेस बंद करणार

बेस्ट ४०० बसेस बंद करणार

आग लागण्याच्या तीन घटनांनंतर निर्णय

Google News Follow

Related

बेस्टच्या सीएनजी बसला आग लागण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही काळात वाढ झाली आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासन सतर्क झाले आहे. बेस्टने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महिनाभरात बसेसला आग लागण्याच्या तीन घटनांनंतर भाड्याने घेतलेल्या ४०० बसेस बंद करणार असल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले. त्यामुळे रोज बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढणार आहेत.

अंधेरी परिसरात बुधवारी सायंकाळी लागलेल्या आगीत बेस्टची बस पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. जोपर्यंत बसवंत उपडे करणारे आणि चालक आवश्यक त्या सुधारणा करत नाहीत आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत बेस्टने सर्व ४०० बसची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. . गेल्या आठवड्यातच बसला आग लागण्याच्या तीन घटना समोर आल्या होत्या. २५ जानेवारी रोजी मुंबईतील वांद्रे परिसरात बेस्टच्या बसला आग लागली होती.

हे ही वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्र्यांची मांदियाळी

मोदींबाबत अपशब्द वापरणारे पवन खेरा शरण आले; मागितली बिनशर्त माफी

एनआयएची मोठी कारवाई, ८ राज्यात ७६ ठिकाणी छापे

दीड लाखांची ब्रँडेड चप्पल, महागड्या जीन्स.. गुंड सुकेश चंद्रशेखरची गजाआड मजा

या निर्णयामुळे प्रवाशांची काही गैरसोय होऊ शकते मात्र सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे असून त्यात आम्ही तडजोड करू शकत नाही, असे बेस्टच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे वेळापत्रकात काही बदल होण्याची शक्यता आहे. बेस्टच्या ताफ्यातील बसची संख्या सुमारे ३,१०० वरून सुमारे २,७०० वर आल्याचे सूत्रांनी सांगितले. आगीच्या घटनांमुळे सीएनजी चालवणाऱ्या बसेसच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे आणि या बसेसच्या सुरक्षित ऑपरेशनची खात्री करण्यासाठी सुरक्षा मानकांचे पालन करण्याचे उत्पादकाचे आश्वासन महत्त्वपूर्ण ठरेल असे बेस्टने म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा