स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त बेस्ट प्रशासन मुंबईत हो हो बस सेवा सुरू करत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या बेस्टने या बसच्या माध्यमातून पर्यटकांसाठी आणखी एक नवीन भेट दिली आहे.
बेस्ट मुंबईकरांसाठी विविध योजना आणत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ही हो-हो बस सेवा आहे. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी दोन ठिकाणी सवलतीच्या दरात अधिक सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बेस्ट प्रशासन हॉप ऑन-हॉप ऑफ म्हणजेच हो-हो सेवेच्या नावाने ही सुविधा सुरू करणार आहे.
बेस्ट प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दर अर्ध्या तासाने सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत ही बससेवा उपलब्ध असेल. यासाठी केवळ १५० रुपये मोजावे लागणार आहेत. एखाद्या पर्यटकाला एखाद्या ठिकाणी उतरून वेळ घालवायचा असेल, तर त्याला त्याच भाड्यात दुसऱ्या बसने पुढे जाण्याची सोय आहे.
हे ही वाचा:
राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत भारताला तिहेरी सुवर्णपदक
वझीरएक्स क्रिप्टो एक्सचेंजची ६४ कोटींची बँक मालमत्ता ईडीने गोठवली
केसरकर म्हणतात, तेव्हा उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते
असा असेल बसचा मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते म्युझियम, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, बाबुल नाथ, पेडर रोड, हाजी अली, महालक्ष्मी रेसकोर्स, धोबी घाट (महालक्ष्मी स्टेशन) मार्गे जिजामाता उद्यान (भायखळा) मार्गावरून जार्इल. परतीच्या प्रवासात ही बस जे. जे. उड्डाणपूलावरून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत नेण्यात येणार आहे.
सोशल मिडियावर माहिती
हो- हो बससेवेची अधिक माहिती इंटरनेट, फेसबुक, ट्विटर, ईमेल, व्हॉट्स अॅप सारख्या सोशल मिडियावर पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.