मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील पहिली एसी डबल डेकर ई-बस बेस्टच्या सेवेत सामील झाली आहे. एसी लोकलनंतर आता मुंबईकरांना एसी डबलडेकर बसमधून कूल कुल प्रवास करता येणार आहे. ही नवीन एसी इ – डबल डेकर बस वांद्रे कुर्ला संकुल ते वांद्रे स्टेशनपर्यंत धावणार आहे. या बसेस टप्प्याटप्प्याने बेस्टच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यानंतर ही बस दक्षिण मुंबईतील काही मार्गांवरुन धावणार आहेत.
बेस्टच्या कुलाबा आगारात पहिल्या ईव्ही डबल डेकरचं सोमवारी पूजन करण्यात आले . छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉइंट, कुलाबा ते वरळी आणि कुर्ला ते सांताक्रुझ या मार्गांवर या बसेस धावताना दिसेल. या बसचं किमान अंतरासाठीचं भाडं सहा रुपये असणार आहे. संपूर्णपणे वातानुकूलित, ऐसपैस आसनव्यस्था, सीसीटीव्ही अशा सुविधा या बसमध्ये आहेत. एकूण २०० बसेस मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत. पहिली नवीन डबल डेकर बस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉइंट, कुलाबा ते वरळी आणि कुर्ला ते सांताक्रुझ या मार्गांवर या बसेस धावताना दिसेल.
हे ही वाचा:
रेल्वेच्या ओव्हरहेड व्हॅनने आपल्याच ४ कर्मचाऱ्यांना चिरडले
लोकसभा सचिवालयाची राहुल गांधी यांना हक्कभंगाची नोटीस
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चावीमुळे बंजारा समाज विकासाच्या मार्गावर
महापालिकेसाठी भाजप मिशन १५० घोषित
प्रत्येक बसची किंमत २ कोटी रुपये आहे . यामध्ये ९० प्रवासी बसण्याची क्षमता आहे.. बस १०० किमीचे अंतर फक्त ४५ मिनिटे चार्ज करून पूर्ण करू शकते तर पूर्ण चार्ज करण्यासाठी ८० मिनिटे लागतात. बेस्टच्या ताफ्यात २०० एसी डबल डेकर ई-बस आल्यामुळे कार्बन प्रदूषणाचे प्रमाण ४१ टक्क्यांनी कमी होणार आहे. इतकेच नाही तर तर वर्षाला २६ दशलक्ष लिटर डिझेलची बचत होईल.