26 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरविशेषप्रवासासाठी अजूनही बेस्टच 'बेस्ट'!

प्रवासासाठी अजूनही बेस्टच ‘बेस्ट’!

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील कोविड आटोक्यात येऊ लागल्यानंतर मुंबईमध्ये सामान्यांना लोकल प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरीही, अजूनही बसला असलेली गर्दी कमी झालेली नाही.

राज्य सरकारने मुंबईची लोकल सेवा १५ ऑगस्टपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केली आहे. मात्र, तरीही प्रवासासाठी लोकलपेक्षा बसच अधिक लोकप्रिय असल्याचे दिसत आहे. अनेक बस स्टॉपवर चाकरमान्यांची प्रचंड गर्दी कायम असल्याचं चित्रं आहे. केवळ दोन डोस घेतलेल्यांनाच लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. शिवाय पासची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे बस स्टॉपवर गर्दी होत असल्याचं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानातून भारतीयांची सुटका करण्यास सुरूवात

अफगाणिस्तान प्रश्नावर काय म्हणाले जो बायडन? वाचा सविस्तर

अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांची लवकरच होणार सुटका

भागीदारी तुमची, पाप तुमचं आणि बोंब मोदी सरकारच्या नावाने!

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा राज्यसरकारने दिलेली आहे. परंतु, तरी देखील लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही. कारण मुंबईमध्ये लसीकरणाचे दोन डोस पूर्ण केलेल्या लोकांच्या संख्येपेक्षा एक डोस घेतलेल्या लोकांची संख्या ही जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना लोकल प्रवास करता येत नाही. म्हणून हे सर्व सामान्य प्रवासी आजही बसने प्रवास करत आहेत. त्याचमुळे मुंबईमधील ठिकाणी बस स्टॉपवर लोकांची मोठी रांग दिसून येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यासंदर्भात सामान्य मुंबईकरांनी प्रशासनाच्या विरोधात आपला रोष सुद्धा व्यक्त केलेला आहे.

मुंबईतल्या शासकीय रुग्णालयामध्ये लस उपलब्ध होत नसल्यामुळे मुंबईकरांचं लसीकरण मोठ्या प्रमाणात होत नाही. परंतु, खासगी रुग्णालयांमध्ये मात्र तीच लस कशी काय मिळते? असा सवाल देखील सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कोविशील्डच्या दोन मात्रांमधील अंतर ८४ दिवसांचे आहे यामुळे देखील लसीकरण लवकर होत नाही. त्यामुळे लोकलसेवेला आम्ही मुकत आहोत. या सर्व संदर्भात प्रशासनाने योग्य असा निर्णय घ्यावा अशी आमची प्रशासनाला विनंती आहे, असं प्रवाशांचं म्हणणं आहे.

दरम्यान, लसीचे दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी नागरिकांसाठी १५ ऑगस्टपासून मुंबई लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. पण आज बोरिवली रेल्वे स्थानकावर गर्दी दिसत नाही. पूर्वीप्रमाणेच स्टेशनवर सामान्य गर्दी दिसून आली. रेल्वे प्लॅटफॉर्मपासून तिकीट खिडकीपर्यंत पूर्वीप्रमाणेच लोक दिसत होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा