मुंबईकर बेस्ट प्रवाशांना आता इलेक्ट्रिक वातानुकूलित बसमधून प्रवास करण्याची प्रतीक्षा आता जवळजवळ संपली आहे. बेस्ट उपक्रमांतर्गत येत्या १८ ऑगस्टपासून बेस्टच्या ताफ्यात नवीन वातानुकूलित डबल डेकर बस दाखल होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच बेस्टने आपल्या ताफ्यात ९०० डबल डेकर बस दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. यातील पहिली बस १८ ऑगस्ट रोजी दाखल होणार आहे. यामध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधांसह दोन जिने, डिजिटल तिकीट प्रणाली तसेच प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे.
बेस्टने आपल्या ताफ्यात ९०० बस टप्याटप्प्याने दाखल करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यातील पहिली बस १८ ऑगस्ट रोजी बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहे. सध्या धावत असेलेल्या डबल डेकर ह्या डिझेलवर धावत आहेत. मात्र, आता दाखल होणाऱ्या बसेस पर्यावरण पूरक असून, प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. लंडनच्या धर्तीवर आधारित या बस मध्ये दोन जिने, सुरक्षतेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आरामदायी प्रवासासाठी उत्तम प्रतीचे शॉक-अपजर लावण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
राहुल गांधी यांचे छाती पिटणे सुरूच
थायलंडमध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू
पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण’ कामगिरी
राहुल गांधी, प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात
भाडे किती असणार ?
सध्या इलेक्ट्रिक वातानुकूलित बस मुंबईतील तीन मार्गावर धावणार आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते नरिमन पॉईंट, कुलाबा ते वरळी, कुर्ला ते सांताक्रुझ या मार्गांचा समावेश करण्यात येणार आहेत. टप्प्याटप्प्याने आणखी सेवा वाढविण्यात येणार आहेत. विशेष म्हणेज ५ किमी अंतरासाठी ६ रुपये भाडे आकारण्यात येणार आहेत.