26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषबेस्ट डबल डेकर बसला हॅप्पी बर्थडे@८५

बेस्ट डबल डेकर बसला हॅप्पी बर्थडे@८५

ब्रिटिशांच्या काळात सुरू झालेली बेस्ट डबल डेक्कर झाली एवढी वर्ष पूर्ण

Google News Follow

Related

मुंबई म्हटलं की आपल्या समोर येते, ते सात बेटांचं शहर म्हणजे मुंबई, याच मुंबईची पूर्वीची जीवनवाहिनी म्हणून बेस्ट बस कडे पाहीलं जात. असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. ऐतिहासिक वारसा असलेल्या बेस्ट उपक्रमातील डबलडेकर अजूनही मुंबईच्या रस्त्यावर धावत आहे. याच बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील पहिली डबल डेकर बस ब्रिटिश काळात ८ डिसेंबर १९३७ रोजी धावली होती. या डबलडेकर बसला गुरुवारी ८५ वर्षे पूर्ण झाली आहे. घोड्याने ओढल्या जाणाऱ्या ट्राम्पपासून ते इलेक्ट्रिक डबल डेक्कर बसपर्यंत बेस्टचा प्रवास मोठा आहे. तर मुंबईकरांच्या सेवेत लवकरच विद्युत वातानुकूलित डब्बल डेक्कर बस सामील होणे आहे.

प्रत्येक सामान्य माणसाची मुंबईत फिरणाऱ्या डबल डेकर बसमध्ये प्रवास करायची इच्छा असते. अजूनही भारतात डबलडेकर फक्त मुंबईच्या रस्त्यावर धावत असून बेस्ट उपक्रमाच्या या डबलडेकर बसला ऐतिहासिक ओळख आहे. विशेषतः दक्षिण मुंबईत डबलडेकर बस धावत असून या डबलडेकरमध्ये प्रवास करण्याची उत्सुकता असल्याने मुंबईकरांची या बसमध्ये नेहमीच गर्दी असते. बेस्टच्या ताफ्यात सध्या ४५ डबल डेकर बस आणि ५ ओपन डेक बस आहेत.

वर्ष १९३७ मध्ये आजच्याच दिवशी सर्वात प्रथम डबल डेक्कर बस भारतीय रस्त्यांवर धावली होती. परंतु, या डबल डेक्करचा इतिहास थोडा मागे विचार केला तर १८२८ मध्ये एका फ्रेंच माणसाने डबल डेक्कर बसची कल्पना सर्वात प्रथम समोर आणली. अखेर १८२९ मध्ये घोड्यांच्या साहय्याने ओढल्या जाणाऱ्या डबल डेक्कर बस रस्त्यावर धावू लागल्या. पुढे काही वर्षांनी मोटारच्या साहाय्याने धावणाऱ्या डबल डेक्कर बस देखील रस्त्यांवर दिसू लागल्या.

निंलाबरी आणि विभावरी

५ ओपन डेस्क बसेसपैकी २ बसना निलांबरी आणि विभावरी अशी नावे आहेत आणि त्यापैकी २ बसला ट्रामचे स्वरूप देण्यात आले आहे. या बसेस उत्तर मुंबईत मुंबई हेरिटेज टूर म्हणून चालवल्या जातात. वरच्या डेकसाठी प्रती प्रवासी १५० रुपये आणि खालच्या डेकसाठी ७५ रुपये असे शुल्क आकरण्यात येते. या बसेस दररोज संध्याकाळी मुंबईच्या रस्त्यावर धावतात आणि वीकेंडला या बसला तुफान प्रतिसाद मिळतो, अशी माहिती बेस्टचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी दिली.

हे ही वाचा :

गुजरातमध्ये हे जिंकले, हे हरले मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास;

पण ‘आप’ला जनतेने त्यांना पूर्ण नाकारले

आपचा गुजरातमध्ये भाजपाला नाही तर काँग्रेसला फटका

पवारांचा संयम संपला… मग आता?

वाढदिवस, पार्टी डबल डेकरमध्ये या खुल्या डेस्क बसेस भाड्याने उपलब्ध असून, या बसमध्ये वाढदिवस आणि पार्टीही करता येऊ शकतात. १२ हजार पेक्षा अधिक दर असून त्यावर १२.५% ​​जीएसटी आकाराला जातो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा