क्रूझवर पार्टीला परवानगी; मात्र रांगोळी, गरब्यावर बंदी

क्रूझवर पार्टीला परवानगी; मात्र रांगोळी, गरब्यावर बंदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाने आगारांमध्ये साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवावर बंधने घातली आहेत. यामुळे कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बेस्ट प्रशासनाने परिपत्रक काढून सर्व आगारांमध्ये या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी लादण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेस्ट प्रशासनाच्या अशाच घातक निर्णयांमुळे बेस्टमधील कामगारांचे कला व क्रीडा विभाग बंद होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी केला आहे.

बेस्ट प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकात लाउडस्पीकरवर बंदी, गरब्यावर बंदी, रांगोळी स्पर्धांवर बंदी, बाहेरील खाद्यपदार्थांना मनाई, असे नियम लादले आहेत. सकाळी आरती करण्यास परवानगी दिली असून सुरक्षित अंतर आणि इतर नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

मुंबई नाशिक प्रवास करता येणार अवघ्या दोन तासांत

शाळेत जाणाऱ्या शिक्षकांनाच झाली शिक्षा!

ईडीसमोर हजर राहण्यासाठी भावना गवळींना हवे अजून १५ दिवस!

मुंबई पालिका म्हणतेय, छट्, तिसरी लाट वगैरे काही येणार नाही!

बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी या निर्णयाला विरोध केला असून त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, मुंबईच्या समुद्रात एका नौकेवर शेकडो लोकांचा धांगडधिंगा चालतो, मात्र बेस्टमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली जात नाही. गेल्यावर्षी रांगोळी स्पर्धा झाली होती. यावर्षी लसीकरणही झालेले असून काय खबरदारी घ्यायची याची कल्पना आहे.

राज्यातील शाळा, मंदिरे खुली झाली आहेत, मग बेस्टमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी लादण्याचे कारण काय? याचा खुलासा बेस्टने करणे आवश्यक आहे. बेस्ट समिती अध्यक्षांकडे विरोध दर्शवला असून हे पत्रक मागे घेण्याचे त्यांनी आश्वासित केल्याचा दावा गणाचार्य यांनी केला आहे.

Exit mobile version