मल्याळी अभिनेता उन्नी मुकुंदनला ४५ मिनिटांत मोदींनी भारावून टाकले!

"माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट ४५ मिनिटे", पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

मल्याळी अभिनेता उन्नी मुकुंदनला ४५ मिनिटांत मोदींनी भारावून टाकले!

उन्नीकृष्णन मुकुंदन हा एक मल्याळी अभिनेता. हा एक भारतीय अभिनेता, निर्माता आणि गायक आहे जो प्रामुख्याने मल्याळम सिनेमात काम करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केरळ दौऱ्यादरम्यान त्याला पंतप्रधानांची भेट घेता आली आणि तो अक्षरशः भारावून गेला. भेटीनंतर त्याने आपल्या आयुष्यात त्यांच्याबद्दल असलेली भेटण्याची ओढ सोशल मीडियावर पोस्ट करत आदर व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कोची येथे ” युवम ”कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते, त्यावेळी ही भेट झाली.

मोदींनी अभिनेता मुकुंदनला ताज मलबार हॉटेलमध्ये आमंत्रित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने अभिनेत्याला उत्साह आवरता आला नाही. मुकुंदनने आपल्या किशोरवयापासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याचे आणि त्यांच्याशी गुजरातीमध्ये बोलण्याचे स्वप्न बाळगले होते. भेटीबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानताना गुजरातमध्ये २० वर्षांहून अधिक काळ वास्तव्य केलेल्या अभिनेत्याने त्यांना वयाच्या १४व्या वर्षी पाहिल्याचे आठवत असल्याचे सांगितले.कोची येथे ‘युवम’ कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी मंचावर गुजराती “केम चो भाईला” बोलत त्यांचे स्वागत केले तेव्हा त्यांनी आपला उत्साह लपविला नाही.

हे ही वाचा:

आयकर खात्याची नाशिकमध्ये धाड; सापडली ३,३३३ कोटींची बेहिशोबी मालमत्ता

रथ जगन्नाथ मंदिराचा! लंडनमध्ये उभारलं जातंय पहिलं मंदिर

गौतमीचा हल्लागुल्ला अजितदादांचा सल्ला

अडीच वर्षे घरी बसणाऱ्यांनी बोलू नये

स्टेजवरील “तुमच्या, “केम छो भाईला” ने मला अक्षरशः हादरवून सोडलं! तुम्हाला भेटून तुमच्याशी गुजरातीमध्ये बोलायचं हे एक मोठं स्वप्न होतं! ते पूर्ण झालं आणि किती छान झालं! तुमच्यासाठी ही ४५ मिनिटं आहेत. मात्र माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम ४५ मिनिटे”आहेत असे मुकुंदन म्हणाला. या अभिनेत्याने असेही सांगितले की, भेटीदरम्यान पंतप्रधानांनी सांगितलेला एक-एक शब्द मी कधीही विसरणार नाही आणि त्यांच्याकडून येणारा प्रत्येक सल्ला प्रत्यक्षात आणला जाईल आणि अंमलात येईल.

“धन्यवाद सर, तुम्हाला १४ वर्षांच्या वयात दुरून पाहिल्यापासून आणि आता भेटल्यापासून, मी अजून सावरलेलो नाही!” असे उन्नी मुकुंदनने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच उन्नी मुकुंदनने फेसबुक पोस्टसह पंतप्रधानांच्या भेटीचे काही फोटोही शेअर केले आहेत.

Exit mobile version