22 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरविशेषबेंगळुरू रामेश्वर कॅफे स्फोटातला मास्टरमाइंड कोलकात्यात सापडला!

बेंगळुरू रामेश्वर कॅफे स्फोटातला मास्टरमाइंड कोलकात्यात सापडला!

एनआयएला मोठं यश

Google News Follow

Related

बेंगळुरू रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेला मोठे यश मिळाले आहे.स्फोटामागील मुख्य आरोपीला एनआयएने पश्चिम बंगालमधून अटक केली आहे.गुन्ह्यानंतर लपून बसलेल्या आरोपीना पथकाने कोलकाता येथून ताब्यात घेतले.हे आरोपी आपली ओळख लपवून कोलकाताजवळ वास्तव्य करत होते.

मुसावीर हुसेन शाजीब आणि अब्दुल मतीन ताहा अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.आरोपी मुसावीर हुसेन शाजीबने कॅफेमध्ये आयईडी ठेवला होता तर अब्दुल मतीन ताहा हा स्फोटाची योजना आणि अंमलबजावणीचा मास्टरमाईंड होता, अशी माहिती एनआयएने दिली.हे दोघेही २०२० च्या दहशतवादाच्या प्रकरणात आधीच वॉन्टेड असल्याचे एनआयएने सांगितले.तसेच एनआयएने सांगितले की, अब्दुल मतीन ताहा हा आयएसआयएसच्या बेंगळुरू मॉड्यूल – अल हिंदमध्ये सामील होता.

हे ही वाचा:

विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी; रब्बी, उन्हाळी पिकांचे नुकसान

मध्य पूर्वेकडील देशांवर युद्धाचे सावट

सहा विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर हरयाणा शाळेला नोटीस

गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का, रोहन गुप्ता यांचा भाजपमध्ये प्रवेश!

एनआयएने सांगितले की, दोघे आरोपी आपली ओळख लपवून लपले होते.मुसावीर हुसेन शाजीब हा आपली ओळख लपवण्यासाठी ‘मोहम्मद जुनेद सय्यद’ नावाचा वापर करत होता तर अब्दुल मतीन ताहा याने हिंदू ओळखपत्र बनवून विघ्नेश नावासह बनावट आधारकार्ड बनवून राहत होता.केंद्रीय गुप्तचर संस्था, पश्चिम बंगाल, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळमधील पोलिस कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कारवाईने दोघा आरोपींना पकडण्यात आले.एनआयएने दोन वॉण्टेड आरोपींवर प्रत्येकी १० लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे.तसेच, गेल्या महिन्यात एनआयएने मुख्य आरोपीला रसद पुरवल्याचा आरोप असलेल्या चिक्कमगलुरू येथील रहिवासी असलेल्या मुझम्मिल शरीफ याला अटक करून ताब्यात घेतले होते.दरम्यान, १ मार्च रोजी रामेश्वरम कॅफेमध्ये हा स्फोट झाला.या स्फोटामध्ये १० जण जखमी झाले होते.कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे खळबळ उडाली होती.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा