देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवल्याचं दिसून येतंय. देशातील अनेक भागात कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. देशातील सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण कर्नाटकातील बंगळुरु जिल्ह्यात सापडले आहेत. या जिल्ह्यात एक लाख ४९ हजार ६२४ इतके ऍक्टिव्ह रुग्ण सापडले आहेत. ऍक्टिव्ह रुग्णसंख्येचा विचार करता पुण्याचा देशात दुसरा क्रमांक लागत असून या जिल्ह्यात १.१६ लाखाहून जास्त ऍक्टिव्ह रुग्ण आढळतात.
गेल्या २४ तासात एकट्या बंगळुरु जिल्ह्यामध्ये कोरोनाचे १६ हजार ६६२ नवीन रुग्ण सापडले असून आता या जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही एक लाख ४९ हजार ६२४ इतकी झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये सध्या एक लाखाच्या जवळ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये ८१ हजार १७४ ऍक्टिव्ह रुग्ण सापडतात.
गेल्या २४ तासात कर्नाटकमध्ये २७ हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे तर १९० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता १२.७४ लाख इतकी झाली असून १४ हजार ७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या २.१४ लाख इतकी आहे.
हे ही वाचा:
पॅरिसमध्ये इस्लामी दहशतवाद्यांकडून पुन्हा हल्ला
विरार दुर्घटनेत हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल
अनिल देशमुखांचे घर, कार्यालयासह, दहा ठिकाणी सीबीआयचे छापे
कोड्यात टाकणारा निर्णय…कलर कोड रद्द
राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केंद्र सरकारकडे १४७१ टन ऑक्सिजनची मागणी केली आहे तसेच दोन लाख रेमडेसिवीरच्या इजेक्शनची मागणी केली आहे.