एका वृद्ध शेतकऱ्याला धोतर परिधान केल्यामुळे मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर कर्नाटक सरकारने बेंगळुरूतील शॉपिंग मॉल आठवडाभरासाठी बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मॉलवर कठोर कारवाईची मागणी करत भाजपने हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर सरकारने कारवाई करत मॉल बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
बेंगळुरूतील जीटी वर्ल्ड मॉलमधील ही घटना आहे. धोतर परिधान केल्यामुळे एका वृद्ध शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. अखेर मॉलवर कारवाई करण्यात आली आहे. नगरविकास आणि नगररचना मंत्री भैरथी सुरेश यांनी या बंदची माहिती विधानसभेत दिली. अशा प्रकरणांवर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
मुस्लीम समाजाची लोकसंख्या १४ वरून ४० टक्यांवर !
सुरतमध्ये ड्रग्जच्या कारखान्यावर छापा, २० कोटींचा कच्चा माल जप्त !
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये पुन्हा चकमक; लष्कराचे दोन जवान जखमी
हाथरस चेंगराचेंगरीवर भोले बाबा म्हणतो, मृत्यू अटळ आहे, ‘आज ना उद्या मरायचे आहे’
विधानसभेत ते म्हणाले की, मी नुकतेच आमच्या एका माजी बीबीएमपी (ब्रुहत बेंगलुरु महानगरा पालीके) आयुक्तांशी बोललो. अशा प्रकरणांवर सरकारला कायद्यानुसार सात दिवस मॉल बंद ठेवण्याची तरतूद आहे. दरम्यान, या प्रकरणी बुधवारी (१७ जुलै) भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १२६(२) अंतर्गत मॉलचा मालक आणि सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर भाजप प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी कर्नाटक सरकारवर जोरदार टीका केली. शेतकरी विरोधी सरकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.