31 C
Mumbai
Saturday, June 29, 2024
घरविशेषप्रज्वल रेवण्णाला कोर्टाकडून आणखी एक झटका, जामीन अर्ज फेटाळला!

प्रज्वल रेवण्णाला कोर्टाकडून आणखी एक झटका, जामीन अर्ज फेटाळला!

प्रज्वल रेवण्णा यांच्यावर एकूण चार गुन्हे दाखल, एसआयटीकडून तपास सुरु

Google News Follow

Related

अनेक महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेले जनता दल (एस)चे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. बेंगळुरू न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. प्रज्वल रेवण्णा आणि त्याचे वडील एचडी रेवण्णा यांच्याविरुद्ध होलेनरसीपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रेवण्णा यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. प्रज्वल रेवण्णा यांचा जमीन अर्ज अखेर बेंगळुरू न्यायालयाने फेटाळून लावला आहे. प्रज्वल रेवण्णाला सध्या विशेष तपास पथकाच्या (SIT) कोठडीत ठेवण्यात आले आहे.

लैंगिक छळाच्या एका प्रकरणात रेवण्णा यांच्या पोलीस कोठडीत वाढ करून ती २९ जून करण्यात आली होती. रेवण्णा याच्यावर अनेक महिलांचे शोषण आणि बलात्काराचे आरोप आहेत. २५ जून रोजी त्याच्यावर आणखी एक एफआयआर नोंदवण्यात आला. एफआयआरमध्ये एकूण तीन जणांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. या नव्या एफआयआरमुळे प्रज्वलवर आतापर्यंत एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटीकडून करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून; ‘हे’ मुद्दे गाजण्याची शक्यता

काँग्रेसने स्वहस्ते केले तोंड काळे…

लोकसभाध्यक्ष बिर्ला म्हणाले, आणीबाणी हा काँग्रेसच्या हुकुमशाहीचा काळा अध्याय

सुनील गावस्करांकडून रोहित शर्मावर स्तुतीसुमने

दरम्यान, जनता दलचे (धर्मनिरपेक्ष) आमदार सूरज रेवण्णा याला रविवारी कर्नाटक पोलिसांनी अटक केली होती. अटक करण्यात आलेला सूरज रेवण्णा हा प्रज्वल रेवण्णाचा सख्खा भाऊ आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रज्वल रेवण्णालाही अटक करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
162,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा