बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोटाचा तपास एनआयएकडे!

पोलिसांच्या आठ पथकाकडून आरोपीचा शोध सुरु

बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोटाचा तपास एनआयएकडे!

बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाचा तपास गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवला आहे.१ मार्च रोजी झालेल्या या स्फोटात किमान १० जण जखमी झाले.बेंगळुरू पोलिस आरोपीचा शोध घेत असून गुन्हा दाखल केला आहे.

१ मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास हा स्फोट झाला.पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक पुरुष कॅफेमध्ये पिशवी ठेवलेले आढळले.पोलिसांच्या तपासानुसार असे दिसून आले आहे की, टायमर असलेल्या आयईडी उपकरणामुळे हा स्फोट झाला होता.तत्पूर्वी, कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी संशयिताला लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.

हे ही वाचा:

मतदानासाठी लाच घेणाऱ्या खासदार, आमदारांवर कारवाई होणार

१० लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी छत्तीसगडमध्ये ठार, जवानही हुतात्मा!

यशस्वी जयस्वालची नजर या पाच ऐतिहासिक विक्रमांवर

भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रोसेवेचे उद्घाटन मोदी करणार

गृहमंत्री जी परमेश्वरा म्हणाले की, आमचा तपास सुरु आहे.या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची आठ टीम तयार करण्यात आल्या असून त्या वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहेत.आम्ही अनेक सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आहेत.आम्ही प्रत्येक अँगलने विचारकरून तपास करत आहोत.याला राजकीय मुद्दा बनवू नका, गृहमंत्री जी परमेश्वरा म्हणाले.ते पुढे म्हणाले की, एनएसजी पथक आले होते.

त्यांच्यासोबत आमची बैठक पार पडली.आम्ही पथकाला नक्की सहकार्य करू.आरोपीला लवकर शोध घेऊन त्याला अटक करा.या प्रकरणाची सर्व माहिती मुख्यामंत्र्यांना दिले जात आहे, असे गृहमंत्री जी परमेश्वरा म्हणाले.दरम्यान, रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.

Exit mobile version