कर्नाटकमधील बंगळूरूमध्ये सध्या पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.पाणी टंचाईची झळ कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना देखील बसली आहे.दरम्यान, कर्नाटक पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाकडून पिण्याच्या पाण्याच्या इतरत्र वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
बंगळुरू शहरातील अनेक भागातील बोअरवेल कोरड्या पडल्यामुळे भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.पिण्याच्या पाण्यासाठी आणि दैनंदिन कामांसाठी खासगी टँकरवर नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे .वाढत्या मागणीमुळे पाण्याच्या टँकरचे दर देखील वाढले आहेत.पिण्याच्या पाण्याच्या वाढत्या दरामध्ये कपात करावी अशी मागणी रहिवाशांनी जिल्हा प्रशासनासमोर ठेवली.यानंतर बेंगळुरूच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चार महिन्यांच्या कालावधीसाठी २०० खासगी टँकरचे दर प्रमाणित केले.दरम्यान, बेंगळुरूची सुमारे ६० टक्के लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे.
हे ही वाचा:
“मराठा आरक्षणाअंतर्गत होत असलेली भरती प्रक्रिया न्यायालयाच्या अधीन राहणार”
१० बस बदलल्या, वेगवेगळे कपडे घातले.. बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोट संशयितांची माहिती समोर!
अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनात ‘उघडपणे’ शस्त्र बाळगण्यास परवानगी!
महिला झाल्या सबल, देशाची वाढली ताकद!
शहरात पाण्याची वाढती समस्या पाहता इतरत्र पाण्याच्या वापरावर सरकारने बंदी घातली आहे.कर्नाटक पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाकडून तसे आदेश जारी करण्यात आले आहेत.कार धुण्यासाठी, बांधकाम, बागकाम आणि देखभाल यासाठी पिण्याच्या पाण्याच्या वापरावर मंडळाने बंदी घातली आहे.एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मंडळाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल ५,००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
दरम्यान, पाणी टंचाईची झळ थेट कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना बसली.त्यांनी जनतेला आश्वासन दिले आहे की, ”बंगळुरूच्या सर्व भागात पाण्याचे संकट आहे. शिवाय त्यांच्या घरातील बोअरवेलही कोरडी पडली आहे.” पाण्याच्या भीषण संकटाचा सामना करत आहोत, परंतु कोणत्याही किंमतीत शहराला पाणीपुरवठा सुनिश्चित करू, असे आश्वासन डी के शिवकुमार यांनी जनतेला दिले.