बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात ‘पुरस्कारवापसी’

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात ‘पुरस्कारवापसी’

बंगाली साहित्यिक रत्ना रशिद बॅनर्जी यांनी पश्चिमबंग बांगला अकादमीचा पुरस्कार परत केला आहे. कारण आहे ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना या अकादमीतर्फे पुरस्कार देण्यात आला म्हणून.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नुकताच बांगला अकादमीने साहित्यासंदर्भातील पुरस्कार प्रदान केला. हा या अकादमीचा पहिलाच पुरस्कार ममता बॅनर्जी यांना देण्यात आला. त्यांच्या कबिता बितन या काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे रत्ना बॅनर्जी या नाराज झाल्या. मुख्यमंत्र्यांना हा पुरस्कार देण्यात आल्यामुळे आपण नाराज आहोत, असे बॅनर्जी म्हणाल्या. साहित्याच्या क्षेत्रात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या प्रचंड योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आळ्याचे अकादमीने म्हटल्यामुळे या पुरस्काराची एकप्रकारे थट्टाच उडविली गेली आहे, असे रत्ना बॅनर्जी यांनी म्हटले आहे. हे वक्तव्य करत रत्ना बॅनर्जी यांनी त्यांना मिळालेला पुरस्कार सरकारला परत केला आहे.

रत्ना बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुरस्कार देऊन अकादमीने वाईट पायंडा पाडला आहे. शिवाय, ज्यांनी बंगाली साहित्याची सेवा केली आहे, त्यांचाही हा अपमान आहे. २०१९मध्ये रत्ना बॅनर्जी यांना अन्नादा शंकर रे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार त्यांनी परत केला आहे. हा पुरस्कार म्हणून देण्यात आलेले मानचिन्ह त्यांनी अकादमीच्या कार्यालयात परत केले आहे.

हे ही वाचा:

कर्नाटकात मशिदीवर फडकला भगवा

‘कोविड हिरो’ जावेद खानवर बलात्काराचा गुन्हा; दाभाडकरांवर झाला होता अन्याय

१९ कोटींच्या घबाडप्रकरणी पूजा सिंघल ईडीच्या अटकेत

‘राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला’

 

दरम्यान, साहित्य अकादमीचे सदस्य आनंदीरंजन बिस्वास यांनीही ममता बॅनर्जी यांना पुरस्कार दिल्याबद्दल राजीनामा दिला आहे. कोलकातातील बंगाली कवितेचा हा अपमान आहे, अशी भावना बिस्वास यांनी व्यक्त केली.

महान कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या १६१व्या जयंतीदिनी बांगला अकादमीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना गौरविले होते. शिक्षण मंत्री बर्त्य बासू यांनी हा पुरस्कार ममतांच्या वतीने स्वीकारला. अर्थात, मंचावर ममता बॅनर्जी उपस्थित असतानाही बासू यांनी पुरस्कार घेतला. साहित्यक्षेत्रात नसलेल्या व्यक्तीला साहित्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.

Exit mobile version