सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबेल तेव्हाच बंगालमध्ये शांतता नांदेल!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच वक्तव्य

सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबेल तेव्हाच बंगालमध्ये शांतता नांदेल!

बांगलादेशकडून सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबली तरच पश्चिम बंगालमध्ये शांतता प्रस्थापित होईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी (२७ ऑक्टोबर) सांगितले. २०२६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष  सत्तेवर आल्यास शेजारील देशातून होणारे अवैध स्थलांतर रोखले जाईल, असा दावा मंत्री शाह यांनी केला. भारत-बांगलादेश सीमेवरील ‘पेट्रोपोल लँड पोर्ट’वर नवीन ‘पॅसेंजर टर्मिनल’ आणि ‘फ्रेंडशिप गेट’च्या उद्घाटनप्रसंगी मंत्री अमित शाह बोलत होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की,  पश्चिम बंगालमध्ये तेव्हाच शांतता येऊ शकते जेव्हा बांगलादेशातून होणारी बेकायदेशीर घुसखोरी पूर्णपणे थांबवली जाईल. बेकायदेशीर स्थलांतरामुळे भारत-बांगलादेशातील शांतता बिघडते. मला बंगालच्या लोकांना सांगायचे आहे की, २०२६ मध्ये बदल करा, परिवर्तन करा आणि आम्ही हे सर्व थांबवू. ही घुसखोरी थांबली तरच बंगालमध्ये शांतता प्रस्थापित होऊ शकते, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

हे ही वाचा : 

‘पहिल्यांदाच डिजिटल अटकेचा उल्लेख, फसवणूक टाळण्यासाठी पंतप्रधानांनी सांगितले तीन उपाय’

‘देवेंद्र फडणवीस राजकीय विरोधक, पण वैयक्तिक शत्रू नाहीत’

वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांच्या १२०० एकर जमिनीवर ठोकला दावा, शेतकरी म्हणाले, आम्ही जायचे कुठे?

पंजाबच्या रेचेल गुप्ताने ‘मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२४’ चा जिंकला ‘ताज’

पेट्रापोल हे दक्षिण आशियातील सर्वात मोठे भूमी बंदर आहे आणि भारत-बांगलादेश यांच्यातील व्यापार आणि वाणिज्यसाठी हे एक महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. पेट्रापोल (भारत)-बेनापोल (बांगलादेश) सीमा बांगलादेश सीमेवरील सर्वात व्यस्त बंदरांपैकी एक आहे कारण दोन्ही देशांमधील सुमारे ७० टक्के व्यापार येथे होतो.

या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जमीन बंदरे महत्त्वाची असल्याचे शाह यांनी नमूद केले. “दोन्ही देशांमधील कनेक्टिव्हिटी आणि संबंध सुधारण्यात जमीन बंदरांची महत्त्वाची भूमिका आहे. ते दोन्ही राष्ट्रांमधील व्यापारी संबंध वाढवतात,” असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

Exit mobile version