मन की बात मधून मोदींनी सांगितलेल्या ‘मीठी क्रांती’चे महत्व

मन की बात मधून मोदींनी सांगितलेल्या ‘मीठी क्रांती’चे महत्व

शेतीला जोडधंदा म्हणून आता शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. मध उत्पादनातून शेतकरी आपले उत्पन्न वाढवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये ‘मीठी क्रांती’चा उल्लेख केला होता. जगातील पाच सर्वात मोठ्या मध उत्पादक देशांमध्ये भारताने आपले स्थान बनवले आहे. याच्या उत्पादनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. शेतकऱ्यांच्याही ही गोष्ट चांगली लक्षात आली आहे. म्हणूनच २००५-०६ च्या तुलनेत देशात मध उत्पादन २४२ टक्क्यांनी वाढले आहे. दरवर्षी आपण सुमारे १.२५ दशलक्ष टन मध उत्पादन करत आहोत.

अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि कतारसारख्या देशांमध्ये वर्षाकाठी सहाशे कोटी रुपयांहून अधिक मध निर्यात होते. पंतप्रधान म्हणाले की देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच मधमाशी पालनमध्ये सामील व्हावे. यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्नही वाढेल आणि त्यांच्या जीवनात गोडवा देखील वाढेल. फार्मा क्षेत्र आणि अन्न उद्योगात त्याची मागणी सतत वाढत आहे.

हे ही वाचा:

लॉकडाऊन महाराष्ट्राला परवडणार नाही

भाजपा सर्वच्या सर्व तीस जागा जिंकेल

गृहमंत्र्यांनी टार्गेट बाजूला ठेवून इथेही जरा लक्ष द्यावे

मोदी आज पुदुचेरीत सभा घेणार

राष्ट्रीय मधमाशी मंडळाच्या अहवालानुसार भारतात १४,१२,६५९ मधमाशी वसाहतींसह एकूण ९,५८० नोंदणीकृत मधमाशा पाळणाऱ्यांची नोंद आहे. प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथरिटीच्या म्हणण्यानुसार, २०१९-२० मध्ये भारताने ५९,५३६.७५ मेट्रिक टन नैसर्गिक मध निर्यात केले. त्या बदल्यात ३६३३.८२ कोटी रुपये प्राप्त झाले. तर २०१८-१९ मध्ये ६१,३३३.८८ टन नैसर्गिक मध निर्यात झाले. त्या बदल्यात ७३२.१६ कोटी रुपये मिळाले.

Exit mobile version