देशातील प्रत्येक वर्गाच्या चांगल्या आरोग्यासाठी मोदी सरकारने आयुष्यमान भारत योजना आणली. या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना देशात सरकारी आणि खासगी रुग्णालयात ५ लाख रुपयांपर्यंत मोफत इलाज करता येतो. मात्र, बनावट आयुष्यमान कार्ड तयार करून या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आली आहे. बनावट आयुष्यमान कार्ड तयार करून रुग्णांवर उपचार करण्याच्या नावाखाली सरकारकडून पैसे वसूल केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी ईडीने दिल्ली, चंदिगढ, पंजाब अंडी हिमाचल प्रदेशातील १९ ठिकाणी छापे टाकले आहेत.
हिमाचल प्रदेशातील कांगडा, उना, मंडी, शिमला आणि कुल्लू या ठिकाणी अशी प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये बांके बिहारी रुग्णालय, फोर्टिस रुग्णालय , अशा रुग्णालयांची नावे समोर आली आहेत. यामध्ये कांगडा जिल्ह्यातील नागरोटा मतदारसंघातले आमदार आरएस बाली यांचे नाव आले आहे. तसेच कांगडा जिल्ह्यातील श्री बालाजी हॉस्पिटलचे डॉ. राजेश शर्मा यांचेही या फसवणुकीत नाव समोर आले आहे.
हे ही वाचा:
अखेर अधीर रंजन चौधरी यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा
राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा !
जपानच्या टोयोटा कंपनीची राज्यात २०,००० कोटींची गुंतवणूक
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी प्रीती सुदान यांची नियुक्ती
दरम्यान, अशी प्रकरणे अनेक समोर येत आहेत, ज्यामध्ये बनावट आयुष्यमान कार्ड तयार करून सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा वापर करत आहेत. दुसऱ्याच्या नावाने आयुष्यमान कार्ड तयार करून वापर करत असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी दोषी लोकांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.