24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषजामनगरमध्ये धरण परिसरात अनेक बेकायदा मजार!

जामनगरमध्ये धरण परिसरात अनेक बेकायदा मजार!

काँग्रेस नेत्याच्या निधीतून बाकड्यांचे वाटप, खांब आणि तारेचे कुंपण

Google News Follow

Related

गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातील रणजीत सागर धरणाजवळील सरकारी जमिनीवरील अतिक्रमण झाल्याचे नुकतेच उघड झाले आहे. येथील हजारो चौरस फूट जागेवर बेकायदा दर्गे आणि मझारही दिसले आहेत. सरकारने २०२२मध्ये हटवण्याचा आदेश दिलेला दर्गा अजूनही उभा आहे.येथील हजारो चौरस फूट जागेवर केवळ बेकायदा मझारच बांधण्यात आलेले नाहीत तर संपूर्ण जागा बळकावण्याचा प्रयत्न येथे झाला आहे. मझारच्या आजूबाजूला कुंपण, बसण्यासाठी बाक आणि इतर बांधकामांचे अतिक्रमण येथे करण्यात आले आहे. येथे अत्तराच्या बाटल्या आणि धार्मिक ग्रंथही सापडले.

बाहेरच्या मुख्य रस्त्यावर ‘हजरत पंजू पीर दर्गा शरीफ’ आणि हिरव्या अक्षरात ७८६-९२ लिहिलेला पांढरा फलक आहे. तेथे दोन्ही वरच्या कोपऱ्यांवर चंद्राच्या ताऱ्यांनी चिन्हांकित केले होते. या फलकाच्या वर एक हिरवा आणि एक लाल असे दोन चौकोनी ध्वज होते, त्यावर इस्लामिक चिन्हे होती.युवराज सोलंकी यांनी काही पत्रकारांना रणजित सागर धरणापर्यंत पोहोचण्यास मदत केली. अतिक्रमित केलेल्या जागेला वेढा घालण्यासाठी काटेरी तारांचे कुंपण घालण्यात आले आहे. रणजितसागर धरण क्षेत्रातील हजारो चौरस फूट क्षेत्र कुंपणाने वेढले आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे पैसे कुठे गुंतवतात?

‘स्वाती मालीवाल हिच्या जीवाला धोका’

दिल्ली: प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी चोरट्याचा २०० वेळा विमान प्रवास!

लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिदनी २०२१मध्ये दिली होती होर्डिंगला परवानगी

येथे एक सिमेंटचा प्लॅटफॉर्म आहे ज्यात तीन मझार आहेत जे अंदाजे ३० फूट लांब आहेत. या वास्तूवर टिनपत्र्यांचे छत आहे. शिवाय, विटा आणि सिमेंटने बांधकाम करण्यात आले आहे. काँक्रीटच्या प्लॅटफॉर्मवर आणि खांबांवर ३१ फूट लांबीची दोन थडगी दिसतात. येथे केवळ छप्पर बांधायचे बाकी आहे. या वास्तूपासून जवळच आणखी एक सहा फुटांची मजर दिसते. येथे पाच थडग्यांसाठी बांधलेली जागा सुमारे ३१ फूट लांब आहे. आजूबाजूच्या परिसरात असंख्य रिकाम्या आणि पूर्ण अत्तराच्या बाटल्या आढळल्या. काही कुपी जमिनीवर पडल्या होत्या, तर काही धरणाच्या पाण्यात बुडाल्या होत्या. अत्तराच्या बाटल्या, रिकाम्या आणि भरलेल्या, प्रामुख्याने काचेच्या आणि प्लास्टिकच्या होत्या.

काटेरी तारांच्या कुंपण असलेल्या जमिनीच्या एका भागात काही मोडतोड केल्याचे आढळले. दर्ग्याच्या शेड बांधण्यासाठी एकसारखे खांब होते. या वस्तू शेजारच्या पडक्या देवस्थानाच्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्याचाच वापर मझारचे छत म्हणून आणि इतर कारणांसाठी केला गेला आहे. ढिगाऱ्याजवळ, काही बाकडीही बसवण्यात आल्याचे दिसले. सर्वसाधारणपणे, हे बाक सोसायट्या, उद्याने आणि नागरिकांना बसण्यासाठी सार्वजनिक जागांवर बांधले जातात, ज्यासाठी खासदार आणि नगरसेवकांनी निधी देतात. या बाकांवर ‘माननीय खासदार विक्रक्रमभाई मदाम, जामनगर – सन २०११-१२ यांच्या निधीतून’ असे लिहिण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा