बेल्जियमने केला डेन्मार्कचा पराभव, मॅसेडोनिया समोर युक्रेन भारी

बेल्जियमने केला डेन्मार्कचा पराभव, मॅसेडोनिया समोर युक्रेन भारी

युरो कप फुटबॉल स्पर्धेत गुरुवार, १७ जून रोजी झालेल्या दोन सामन्यांमध्ये युक्रेन आणि बेल्जियम हे दोन संघ विजयी ठरले आहेत. उक्रेनने उत्तर मॅसेडोनिया संघाचा पराभव केला आहे. तर बेल्जियमने डेन्मार्कला धुळ चारली आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघ २-१ या फरकाने विजय झाले आहेत.

गुरुवारचा पहिला सामना हा युक्रेन आणि उत्तर मॅसेडोनिया या दोन संघांमध्ये खेळला गेला. यात सुरुवातीपासून युक्रेन संघाची सामन्यावरवर पकड दिसून आली. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत युक्रेन संघाकडून नॉर्थ मॅसेडोनियाच्या गोलपोस्टवर वारंवार हल्ले सुरू होते. २९ व्या मिनिटाला युक्रेनचा खेळाडू अँद्रिय यार्मोलेंको याने गोल करत युक्रेन संघाला आघाडी मिळवून दिली. तर ३४ व्या मिनिटाला रोमन यारेमचूक याने ही आघाडी वाढवली.

हे ही वाचा :

शिवसेनेत ‘राम’ राहिला नाही!

‘शर्मा यांच्यासह काम करणाऱ्या पंटर्सचा मनसुखच्या हत्येत हात’

वाझेला शंभर कोटीचे टार्गेट, प्रदीप शर्माला कितीचे?

भारताच्या उत्तर आणि ईशान्य सीमा भागातील १२ महत्वाच्या रस्त्यांचे लोकार्पण

सामन्याच्या उत्तरार्धात ५७ व्या मिनिटाला मॅसेडोनिया संघाला पेनल्टी देण्यात आली. ॲलिओस्की हा खेळाडू ही पेनल्टी घेण्यासाठी सरसावला. पण हा गोल वाचवण्यात युक्रेनच्या गोलकीपरला यश आले. पण तो बॉल आपल्या ताब्यात ठेवायला अपयशी ठरला. तेव्हा ॲलिओस्कीने सतर्कता दाखवत गोल नोंदवला. यानंतर सामन्यात परतण्याच्या दृष्टीने मॅसेडोनिया संघाकडून प्रयत्न केले गेले पण त्यांना यश आले नाही.

तर गुरुवारच्या दुसऱ्या सामन्यात डेन्मार्क विरोधात बेल्जियमने विजय नोंदवला. खरंतर सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला डेन्मार्क कडून युसुफ पॉल्सेन याने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली होती. पण तरीही सामन्याच्या उत्तरार्धात बेल्जियमने पुनरागमन करत डेन्मार्कला पराभूत केले. थॉर्गन हॅजार्ड यांनी ५४ व्या मिनिटाला गोल करत बेल्जियमला बरोबरी साधून दिली. तर ७० व्या मिनिटाला अप्रतिम सांघिक खेळाचे प्रदर्शन करत केविन दि ब्रुएन याने गोल करून बेल्जियमला विजयी आघाडी मिळवून दिली. या संपूर्ण सामन्यात ख्रिश्चन एरिकसेनची उपस्थिती डेन्मार्क संघाला आणि चाहत्यांना वेळोवेळी जाणवत होती.

Exit mobile version