देशाच्या राष्ट्रपती आदिवासी आणि विधवा असल्यामुळेच संसदेच्या उद्घाटनासाठी त्यांना आमंत्रित केलं नसल्याचं वादग्रस्त वक्तव्य द्रमुक नेते आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं आहे.तसेच सनातन संपल्यानं जातिभेदही संपुष्टात येतील, असंही ते म्हणाले
तामिळनाडूचे मंत्री आणि द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी मागील काही दिवसांपूर्वी सनातन धर्माला डेंग्यु, मच्छर, मलेरिया अशी उपमा दिली होती. त्यानंतर सर्वत्र स्तरावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली .आता पुन्हा एकदा बेताल वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला आहे.संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला देशाच्या राष्ट्रपती द्रौपजी मुर्मू यांना आमंत्रित न केल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले.उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आलं नाही, कारण त्या विधवा आहे आणि आदिवासी समाजातील आहेत. यालाच आपण सनातन धर्म म्हणतो का? असं म्हणत उदयनिधी स्टॅलिन यांनी अप्रत्यक्षरित्या मोदी सरकारवर निशाणा साधला.बुधवारी मदुराई येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
हे ही वाचा:
मुस्लिम महिलांना आरक्षणात स्थान नसल्यामुळे विधेयकाला ओवैसींचा विरोध !
लष्करी अधिकारी-जवनांमध्ये फूट पाडू नका!
धावत्या टॅक्सिमध्ये गतिमंद मुलीवर बलात्कार !
खलिस्तानी दहशतवादी सुखदूल सिंग याची कॅनडामध्ये गोळ्या घालून हत्या
संसदेच्या उद्घाटनाला तामिळनाडूतील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रित केलं होतं, मात्र भारताच्या राष्ट्रपतींना यापासून बाजूला सारलं होत.सुमारे 800 कोटी रुपये खर्चून बांधलेलं नवं संसद भवन हा एक महत्त्वाचा प्रकल्प होता,त्यासाठी देशाच्या पहिल्या नागरिक म्हणून राष्ट्रपतींना बोलावणे गरजेचे असूनही त्यांना निमंत्रित करण्यात आलं नाही.कारण त्या आदिवासी पार्श्वभूमी आणि त्या विधवा असल्यानं त्यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं होतं,हा सनातन धर्म आहे का? तसेच आता विशेष अधिवेशनासाठीही त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं नाही, असंही उदयनिधी स्टॅलिन म्हणाले.
संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडलं गेले होतं तेव्हा राष्ट्रपतींना डावलून सिनेसृष्टीतील अभिनेत्रींना बोलवण्यात आले होते.या घटना म्हणजे अशा निर्णयांवर ‘सनातन धर्मा’चा प्रभाव असल्याचं द्योतकच, असा दावाही उदयनिधी स्टॅलिन यांनी केला आहे.उदयनिधी यांनी ‘सनातन धर्मा’वर केलेल्या सुरुवातीच्या टीकेनंतर निर्माण झालेल्या वादाच्या संदर्भातही वक्तव्य केलं. ते म्हणाले की, लोकांनी माझ्या डोक्याची किंमत ठरवून दिली आहे. मी अशा गोष्टींबद्दल कधीही काळजी करणार नाही. द्रमुकची स्थापना सनातनला संपवण्याच्या तत्त्वांवर झाली. आमचं ध्येय साध्य होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे ते म्हणाले.