महाराष्ट्र बंद मागे; पवारांच्या ट्विटने ठाकरेंची हवाच काढली !

तोंडाला काळ्या फित्या अन हातात काळे झेंडे घेवून निषेध, उद्धव ठाकरे

महाराष्ट्र बंद मागे; पवारांच्या ट्विटने ठाकरेंची हवाच काढली !

बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या (२४ ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी यामधून माघार घेतली. शरद पवार यांच्या मागोमाग कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी देखील हात वर केले. शरद पवार आणि नाना पटोले यांनी माघार घेताच नाईलाजाने उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेत यामधून माघार घेतली.

महाराष्ट्र बंद अशी उद्धव ठाकरेंनी हाक दिल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देत कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसल्याचे म्हटले. जर कोणी तसा प्रयत्न केला तर कारवाई करण्याचे आदेश सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने दिले. यानंतर शरद पवार यांनी ट्विटकरत बंद मागे घेण्याचं आवाहन केलं.

शरद पवार म्हणाले की, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते.

हे ही वाचा :

बलात्काराचे राजकारण करण्याची वेळ का आली?

रशियाच्या तुरुंगावर ISIS च्या दहशतवाद्यांचा ताबा !

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र बंद मागे घ्या!

गळाभेट, मग खांद्यावर हात, पंतप्रधान मोदी अन झेलेन्स्की यांची ऐतिहासिक भेट !

शरद पवार यांच्या आवाहनानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील न्यायालयाच्या आदेशाचा मान राखत बंद मागे घेत असल्याचं जाहीर केले. यानंतर सर्वांचे लक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे होते, परंतु पत्रकार परिषद घेत त्यांनी  देखील महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचे सांगितले. मात्र, तरीही आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या प्रमाणे न्यायालयाने तत्परतेने निर्णय दिला तशाच तत्परतेने गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई करावी. उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य नाही. पण कोर्टाचा आदर ठेवावा लागतो. या निर्णयाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. मात्र, यावर सुनावणी होईपर्यंत बराच वेळ जाईल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची वेळ नाही. त्यामुळे जनतेच्या मनातील उद्रेक उफाळला तर सर्वांना कठीण होईल. म्हणून आम्ही ठरवलं आहे, ज्या प्रमाणे शरद पवारांनी उद्याचा बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. त्याप्रमाणे आम्ही देखील बंद मागे घेत आहोत. मात्र, उद्या राज्यातील प्रत्येक गावातील, शहरातील चौकामध्ये आमचे कार्यकर्ते तोंडाला काळ्या फित्या, हातात काळे झेंडे घेवून या संपूर्ण घटनेचा निषेध करतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Exit mobile version