बोरिवली पश्चिमेकडील दत्तपाडा फाटक रोड ते चांदावरकर रस्त्यापर्यंत स्कायवॉक बांधण्यात आला आहे. हा बोरिवली पश्चिमेकडील स्कायवॉक भिकारी आणि गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. अनेकांनी स्कायवॉकवर झोपड्या उभारल्या आहेत. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पादचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. स्कायवॉकवर अनेक ठिकाणी रेलिंग आणि लाद्या तुटल्या आहेत. त्यामुळे दुर्घटनेची शक्यता असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बोरिवली पश्चिमेकडील दत्तपाडा फाटक रोड ते चांदावरकर रस्त्यापर्यंतच्या स्कायवॉकवर भिकारी आणि गर्दुल्ल्यांनी आपला अड्डा बनवला आहे. अनेकांनी राहण्यासाठी म्हणून स्कायवॉकवर झोपड्या बांधल्या आहेत. पुलावर घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांना आपले नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गर्दुल्ले आणि भिकारी हे स्कायवॉकवरच झोपत असून त्यांनी तिथेच ठाण मांडला आहे. पुलावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्याचप्रमाणे पुलावर प्रेमीयुगुलांनीही ठाण मांडले आहे त्यामुळे प्रवाशांना पुलावरून जाताना मोठी अडचण निर्माण होत आहे.
हे ही वाचा:
सार्वजनिक गणेशोत्सव आगमन-विसर्जनात १० जण नाचणार
शिवडी बीडीडी चाळ रहिवासी वाट पाहात आहेत!
चोरट्यांकडे एक गाडी, आठ लॅपटॉप
विद्यार्थिनींना मिळणार एनडीएमध्ये प्रवेश
स्कायवॉक बांधण्यासाठी कोट्यवधी खर्च केले होते त्याच पुलावर आता अनेक जण चुली पेटवून अन्न शिजवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ज्वलनशील वस्तू खाली पडून रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या पादचाऱ्यांचा आणि वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुलाच्या अनेक लाद्या तुटल्या आहेत तसेच पुलावरील रेलिंगही अनेक ठिकाणी तुटली आहे. पुलाला भेगा पडल्या आहेत त्यामुळे पालिकेने लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.