रेल्वे प्रवासी महिलेला दगडामुळे गमवावा लागला डोळा

राज्यराणी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या डाव्या डोळ्यावर दगड लागल्याने डोळा निकामी झाल्याची घटना घडली

रेल्वे प्रवासी महिलेला दगडामुळे गमवावा लागला डोळा

राज्यराणी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या डाव्या डोळ्यावर दगड लागल्याने डोळा निकामी झाल्याची घटना घडली. ती ट्रेन ह्या हल्ल्याचा वेळी आंबिवली-शहाड ह्या मार्गातून जात होती. ही घटना २८ नोव्हेंबर रोजी घडली.

रक्माबाई पाटील हे ह्या पीडित महिलेचा नाव आहे आणि त्या ठाण्यातील दिवा येते राहायच्या. ते आपल्या कुटूंबासकट त्यांच्या गावी नांदेड येते धार्मिक कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. ह्या कार्यक्रमातून परतताना ही गंभीर घटना घडली. त्या ट्रेन वर अचानक दगडफेक करण्यात आली आणि एक दगड रक्माबाइंच्या डाव्या डोळ्यावर जाऊन लागला. ही घटना घडल्यावर ताबडतोब रेल्वे पोलिसांना संपर्क करण्यात आला. पोलीसांनी त्यांना रुक्मिणीबाई रुग्णालायात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांना त्यांचा डावा डोळा फुटल्याचे कळले. डॉक्टरांच्या अहवालानुसार त्यांच्या डाव्या डोलाच्या कॉर्नियामध्ये इजा झालेली होती. तरीही जास्त वेळ वाया ना घालवता त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

हे ही वाचा : 

सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक

नाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका

शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार

राहुल गांधींविरोधात रणजीत सावरकर यांचा नोंदविला जबाब

रेल्वे पोलीस ह्यांच्या अनुसार आंबिवली-शहाड ह्या मार्गावर नेहमीच ही दगडफेक आणि मारामाऱ्या चालूच असतात. ह्या दरोडेखोरांचे मुख्य हेतू प्रवाश्यांवर हल्ला करून चोरी करणं असतो. हल्ला करायला हे दरोडेखोर काठ्या आणि दगडांचा वापर करतात. जीआरपी आणि आरपीएफने या भागात वाढीव गस्त सुनिश्चित करण्यासाठी आठ संवेदनशील पॉइंट्स आपापसात विभागले आहेत. सोमवारची ही घटना आरपीएफच्या ताब्यात असलेल्या भागात घडली. उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या सरचिटणीस लता अरगडे म्हणाल्या की, रेल्वे प्रशासनाने अशा संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत.

Exit mobile version