अरबी समुद्रातून गुजरात किनारपट्टीकडे येणाऱ्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य वन विभागाने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. सौराष्ट्रमधील आशियाई सिंह क्षेत्र असलेल्या भागाभोवती सुरक्षा जाळी टाकण्यात येत आहे. तसेच वन विभागाने शंभरहून अधिक सिंहांना किनारपट्टीच्या भागात उच्च-सुरक्षतेत ठेवले आहे. तसेच त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी विविध रणनीती वापरल्या आहेत.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गीर सोमनाथ-भावनगर मार्गावरील किनारपट्टीच्या जवळ असलेल्यांना यापूर्वीच हलविण्यात आले आहे. या प्राण्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले असून त्यांना मांसाचे आमिष दाखवून अधिक उंचीवर नेण्यात आले आहे. वन अधिकारी चक्रीवादळाच्या स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत जेणेकरून जेव्हा आवश्यक असेल तेव्हा जवळच्या डोंगररांगांसारख्या उंच ठिकाणी सिंहांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवता येईल.
सिंहांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांना नेव्हिगेट करण्यासाठीन वेगवेगळ्या रणनीती वापरल्या जातात. खाकी कपडे घातलेल्या बीट रक्षकांवर सिंह सहसा हल्ला करत नाही. त्यामुळे साधारणपणे, असे तीन ते चार रक्षक सिंहांचा कळप एक किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी नेतात. यावेळी रक्षक सिंहांना त्रास न देता त्यांना घेरतात आणि सुरक्षित ठिकाणी घेऊन जातात. जुनागढच्या मुख्य वनसंरक्षक आराधना साहू यांनी सांगितले की, त्यांनी डॉक्टरांचे पथक आणि बचाव पथकांसह किनारपट्टीवर २१ नियंत्रण केंद्रे उभारली आहेत.
हे ही वाचा:
मोबाईलसाठी एक लाख चोरले, पण वडिलांच्या धाकाने केली आत्महत्या!
दिल्लीपेक्षा उंच एस्केलेटर आता मुंबईत; टी २ मेट्रो स्टेशनमध्ये होणार
‘बिपरजॉय’चा फटका गुजरातला, ३० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं
दिल्लीपेक्षा उंच एस्केलेटर आता मुंबईत; टी २ मेट्रो स्टेशनमध्ये होणार
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘बिपरजॉय’ वादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे वादळ आणखी भीषण स्वरूप धारण करू शकते, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळापूर्वी गुजरातमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून आतापर्यंत ३० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.