नागरिकांच्या रक्षणासाठी व गुन्हेगारी रोखण्यासाठी उपयुक्त अशा बिट चौक्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून उभारण्यात येत असतात. कुर्ला संजय नगर मध्ये बिट चौकीचे आवश्यकता लक्षात घेऊन आमदार दिलीप लांडे यांनी बिट चौकीचे निर्माण केले या बिट चौकीचे आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बुधवार ७ सप्टेंबर रोजी मुंबई पूर्व उपनगरातील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांची उदघाटने केली. घाटकोपर च्या संजय नगर या अतिशय डोंगराळ आणि दाट झोपडपट्टी असलेल्या घाटकोपर पोलीस ठाणेच्या अंतर्गत येणाऱ्या विभागात सुसज्ज अशी भव्य पोलीस बिट चौकी आमदार दिलीप लांडे यांच्या माध्यमातून उभी करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
बाप्पाचं आधारकार्ड पाहिलंत का?
जपानमध्ये बाप्पाचं धुमधडाक्यात स्वागत
‘राहुुल गांधी यांनी अखंड भारत यात्रा काढावी तिही पाकिस्तानातून’
डिमॅट खात्यांनी ओलांडली १० कोटींची संख्या
याचे उद्घाटन पोलीस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, अपर पोलीस आयुक्त संजय दराडे, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम आणि घाटकोपर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद नेर्लेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही वास्तू म्हणजे पोलीस, लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्या सहकार्याचे प्रतीक आहे. याठिकाणी लोकांना योग्य सेवा दिली जाईल. आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून ही वास्तू उभी राहिली हे चांगले कार्य केले आहे. आम्ही जास्तीत जास्त पोलिसांच्या सुखसुविधा साठी काम करणार आहोत, अशी प्रतिक्रिया मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली. नागरिकांच्या सुविधेसाठी लवकरच साकीनाका आणि घाटकोपरच्या मध्यभागी नवीन पोलीस ठाणे तयार करणार असल्याचे आणि साकीनाका पोलीस ठाणेचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे आमदार दिलीप लांडे यांनी सांगितले .