‘श्रेष्ठ महाराष्ट्र–विकसित महाराष्ट्रा’चा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जनजागृतीसाठी ‘सजग रहो’ हे अभियान राबविण्याचा निर्णय महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थांकडून घेण्यात आला आहे. विकसित महाराष्ट्रासाठी ‘विद्वेषमुक्त महाराष्ट्रा’चा संकल्प विविध संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आला. ‘सजग रहो’ अभियानासंदर्भात पुण्यामध्ये बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पत्रकार परिषदेला ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते क्षितिज टेक्सास गायकवाड, पद्मश्री गिरीश प्रभुणे, दलित साहित्याचे अभ्यासक डॉ. धनंजय भिसे, ॲड. अभिजित देशमुख यांनी संबोधित केले. यावेळी बैठकीसंदर्भात आणि त्यातील मुद्द्यांबाबत माहिती देण्यात आली.
महाराष्ट्रातील विविध ६५ संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. विकसित भारताची संकल्पना मांडून त्या दिशेने गेल्या १० वर्षांत दमदार वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रात मात्र या वाटचालीला रोखण्यासाठी विविध मार्गांनी बुद्धिभेद करण्यात येत आहे. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी महाराष्ट्रात शिवछत्रपतींनी अठरापगड जातींना एकत्र आणले आणि विविध पातशाह्यांना आस्मान दाखविले, त्याच महाराष्ट्रात जातीय विद्वेष जाणीवपूर्वक पोसण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. देशातील सर्वाधिक प्रगतिशील असलेल्या महाराष्ट्रासमोरचे हे आव्हान पेलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना सक्रिय भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे, अशी भावना या बैठकीतील विविध प्रतिनिधींनी व्यक्त केली.
हे ही वाचा :
‘महाराष्ट्रासाठी झटला, बहुजनांसाठी राबला, प्रस्थापितांना खुपला’
चेंबूरमध्ये भीषण आगीत सात जणांचा मृत्यू
हिमालयात अडकलेल्या युके, युएसच्या महिलांची सुटका
जम्मू-काश्मीर: निकालापूर्वी दहशतवाद्यांचा कट हाणून पाडला, शस्त्रे-स्फोटके जप्त!
गेल्या दहा वर्षांत अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी आणि मागास समाजासाठी सर्वाधिक योजना आणण्यात आल्या आहेत आणि त्या य़शस्वीपणे राबविल्या गेल्या. परंतु या समाजाला संभ्रमित करण्यासाठी सातत्याने समाजातील काही राजकीय पक्षांच्या व्यक्ती आणि दांभिक सामाजिक संस्था पूर्ण ताकदीनिशी प्रयत्नात आहेत. त्यांचा हा प्रयत्न लोकसभा निवडणुकीत काही प्रमाणात यशस्वी झालेला आहे, परंतु देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या हे इरादे उधळून लावलेच पाहिजेत, यावरही बैठकीत एकमत व्यक्त करण्यात आले. महाराष्ट्रविरोधी आणि हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच विचार करणार्या शक्तींना रोखण्यासाठी समाजाशी संवाद साधण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेवराव कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रमुणे, मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे, दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक-अध्यक्ष मिलिंद कांबळे, ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, सुदर्शन वाहिनीचे संस्थापक सुरेश चव्हाणके, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते क्षितिज गायकवाड, ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. उदय निरगुडकर, शिवसृष्टीचे अध्यक्ष जगदीश कदम, विवेक विचार मंचचे प्रदीपदादा रावत यांच्यासह दोनशे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झालेले होते, अशीही माहिती देण्यात आली.