वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आजपासून एकदिवसीय तसेच टी-२० या दोन प्रकारात एका नव्या नियमाला सुरुवात होणार आहे. वेळ वाया जाऊ नये यासाठी आयसीसीने हे पाऊल उचलले आहे. या नियमामुळे टाइमपास करणाऱ्या संघावर अंकुशही बसेल. या सामन्यात सर्वप्रथम स्टॉप वॉच वापरण्यात येणार आहे. हा नियमाची अंमलबजावणी आजपासून ते एप्रिल २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे. या कालावधीत एकूण ५९ सामने खेळवण्यात येणार आहेत.
या नियमानुसार, दोन षटकांमध्ये फक्त ६० सेकंदांचाच अवधी मिळणार आहे. एक षटक पूर्ण झाल्यानंतर ६० सेकंद पूर्ण होण्याआधी दुसरे षटक टाकायला गोलंदाजाने तयार राहायला हवे असा नियम तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आला आहे. एक षटक संपल्यावर मैदानावरील स्क्रीनवर टाइमर सुरू केला जाईल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून वेळेचे पालन झाल्यास त्यांना दोन वेळा ताकीद देण्यात येईल. पण गोलंदाजांने ६० सेकंदांचा अवधी तीन वेळा ओलांडल्यास त्यांना पाच धावांना मुकावे लागणार आहे. अर्थातच त्यांना पाच धावांची पेनल्टी लागणार आहे. ६० सेकंदाचा कालावधी सुरू करण्याची जबाबदारी तिसऱ्या अम्पायरकडे असणार आहे.
हे ही वाचा :
तीन तलाक, सेंट्रल व्हिस्टा… मोदी सरकारच्या सात निर्णयांवर सर्वोच्च न्यायालयाचीही मोहोर!
दिशा सालियन प्रकरणी एसआयटी स्थापनेचे पोलिसांना आदेश
आरएसएस मुख्यालयाला प्रणब मुखर्जी यांनी भेट दिली तेव्हा…
तीन तलाक, सेंट्रल व्हिस्टा… मोदी सरकारच्या सात निर्णयांवर सर्वोच्च न्यायालयाचीही मोहोर!
टी-२० तसेच एकदिवसीय सामन्यात खेळाडूंकडून षटकांची गती राखली जात नाही. तसेच काही वेळा मैदानात विनाकारण वेळ वाया घालवला जातो. याची आयसीसीकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. अशा घटनांना आळा बसवण्यासाठी आयसीसीकडून नव्या नियमाचा अवलंब करण्यात आला आहे.
हे घड्याळ केव्हा बंद होईल.
- दोन षटकांच्यामध्ये नवीन फलंदाज फलंदाजीला येत असेल तेव्हा.
- अधिकृत ड्रिंक्सब्रेक वेळी
- फलंदाज किंवा क्षेत्ररक्षक दुखापतग्रस्त होईल तेव्हा अम्पायरने त्याच्यावरील उपचाराला मान्यता दिली तेव्हा
- क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची चूक नसताना वेळ वाया जाईल तेव्हा